आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलीय.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार
आषाढी वारी, फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 11:23 PM

पुणे : संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 04 जुलै पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलीय. देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतलाय (Pimpri Chinchwad police impose Curfew in Dehu and Alandi amid Ashadhi Wari).

या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. देहू, आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरु आणि काय बंद?

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेमधील (Essential Category ) दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने ( Non-Essential Shops) सोमवार शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
  • मॉल, सिनेमागृह (Single Screen and Multiplex) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा (Home Delivery ) रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
  • लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा Airport Services), बंदरे सेवा ( Port Services यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील,
  • सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) 50% कर्मचारी क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविंड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Government Offices and Emergency Services required for Covid-19 Management) 100 % क्षमतेने सुरु राहतील.
  • शासकीय कार्यालये अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ) 50% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.
  • सर्व आउटडोअर स्पोर्ट्स ( outdoor games) सर्व दिवस सकाळी 5 ते 9 या वेळेत सुरु राहतील.
  • सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवारदुपारी 4 वाजपर्यंत परवानगी राहील. उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा 3 तासांपेक्षा जास्त असू नये सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.
  • आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात Covid Appropriate Behaviour (CAB) चे पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच बारंबार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा केंद्र शासन कोविड 19 आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.
  • पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.
  • लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
  • महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी 4 वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.
  • कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास ( जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी 5 नंतर ( अत्यावश्यक कारण वगळता ) संचारबंदी लागू राहील.
  • व्यायामशाळा ( Gym), सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (by appointment) दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु

हेही वाचा :

आषाढी एकादशी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्याचा प्रस्ताव, पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय शक्य

यंदाची वारी कशी व्हावी? पंढरपुरातील व्यापाऱ्यांना काय वाटतं?

लस घेतलेल्यांनीच वारीसाठी पंढरपुरात यावं, दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

व्हिडीओ पाहा :

Pimpri Chinchwad police impose Curfew in Dehu and Alandi amid Ashadhi Wari

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.