राज्य सरकारला वाईन शॉप, डान्सबार खुले चालतात, मग पायी वारी का नको? : प्रविण दरकेर

कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

मुंबई : “कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. असं असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे,” अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली . कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI