AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार

संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला (Pohradevi) शरण जाणार असल्याची माहिती आहे (Sanjay Rathod Poharadevi family)

Sanjay Rathod | शिवसेना नेते संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार
शिवसेना नेते संजय राठोड
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 20, 2021 | 2:00 PM
Share

मुंबई : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला जाणार असल्याची माहिती आहे. येत्या मंगळवारी (23 फेब्रुवारी) दुपारी एक वाजता राठोड कुटुंबीय पोहरादेवीला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राठोड पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे. पोहरादेवीच्या दर्शनानंतर राठोड काय भूमिका घेणार, आरोपांचं खंडन करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Sanjay Rathod to visit Poharadevi with family)

प्रसारमाध्यमांसाठी नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला (Pohradevi) शरण जाणार असल्याची माहिती आहे. पोहरादेवी हे बंजारा समाजाची (Banjara) काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.

पोहरादेवीचं महत्व काय? 

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.

पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

संत सेवालाल यांचे वंशज रामरावबापू महाराज कालवश

डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रद्धा होती. इतरही समाजात त्यांना मान होता.

रामराव महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.

बंजारा समाज पाठीशी

दरम्यान, संजय राठोड यांच्या पाठिशी बंजार समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची काल बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

संबंधित बातम्या :

Sanjay Rathod : राजीनामा देऊन संजय राठोड पोहरादेवीला शरण जाणार?

संजय राठोड नॉटरिचेबल, पण वन मंत्रालयाचं कामकाज सुरू

(Sanjay Rathod to visit Poharadevi with family)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...