AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पेशल रिपोर्ट : संजय राऊत – ‘मातोश्री’चा चाणक्य! भाजपला अंगावर घेणारा शिवसैनिक!

शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशी अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत (Sanjay Raut Shiv Senas Chanakya tv9 marathi) नेहमीच भाजपला अंगावर घेत आले आहेत.

स्पेशल रिपोर्ट : संजय राऊत - 'मातोश्री'चा चाणक्य! भाजपला अंगावर घेणारा शिवसैनिक!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 02, 2019 | 11:24 AM
Share

मुंबई : सत्तेच्या वाटाघाटीत सध्या सर्वाधिक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut Shiv Senas Chanakya tv9 marathi) यांचं. शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशी अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत (Sanjay Raut Shiv Senas Chanakya tv9 marathi) नेहमीच भाजपला अंगावर घेत आले आहेत. भलेही शिवसेनेनं भूमिका बदलून संजय राऊतांना तोंडावर पाडलं असेल, मात्र पक्षाच्या भूमिकांसाठी ते ठाम राहिले आहेत.

एखाद्या पक्षाला जसा विद्वान लागतो, तसाच पैलवानही हवा असतो. संजय राऊत हे आळीपाळीनं विद्वान आणि पैलवान या दोन्ही भूमिका नेटकेपणानं बजावतात. म्हणूनच मास बेस नसला, तरी राजकारणात राऊतांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. शिवसेनेला काय करायचंय, यापेक्षा शिवसेना काय करु शकते. त्या शक्यतेचं नाव म्हणजे संजय राऊत.

शिवसेनेनं अनेकदा आपल्या भूमिकेत फेरबदल केलेत, पण ती भूमिका ज्यांच्या रुपानं पहिल्यांदा समोर येते, ते म्हणजे संजय राऊत. सध्यस्थितीत आणि मागच्या 5 वर्षातही संजय राऊतांइतकं भाजपला कुणीच डिवचलं नसेल. कुणी त्यांना शकुणीची उपमा दिली, तर कुणी नारदाची.

पण संजय राऊतांनी शिवसेनेचा मूळ स्वभाव कधीच टाकला नाही. जेव्हा-जेव्हा भाजपकडून शिवसेनेवर वार झाले, तेव्हा-तेव्हा संजय राऊतांनी ते परतवून लावले. भाजपला अंगावर घेऊन त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेत संजय राऊत हेच एकमेव पर्याय आहेत का? या प्रश्नाचं उत्तर, तूर्तास तरी हो असंच आहे.

दिल्लीत भाजपविरोधात मोर्चेबांधणीसाठी चंद्राबाबूपर्यंत ते ममता बॅनर्जींपर्यंतच्या भेटीगाठी असो. संजय राऊत प्रत्येक आघाडीवर पुढे राहिले. शिवसेना नेते तसे फारसे इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये वावरताना दिसत नाहीत. पण शिवसेनेचा कडवटपणा कायम ठेवून सर्व पक्षांमध्ये ज्यांना सहज अॅक्सेस आहे, असा एकमेव नेता म्हणून संजय राऊतांकडेच पाहिलं जातं. संजय राऊत हे महाराष्ट्रात शिवसेनेचे आणि दिल्लीत पवारांचे स्नेही असतात, अशा चर्चाही होतात. मात्र राऊतांच्या याच स्नेहानं भाजपच्या सत्तेची चव अनेकदा खारट केली आहे. म्हणूनच हिंदुत्वाआडून ठसठसीत पुढे येणारी ”मराठी अस्मिता” राऊतांच्या बोलण्यातून वारंवार जाणवते.

कधी-काळी राऊत हे राज ठाकरेंच्याही जवळचे होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मनधरणीसाठी राऊत आणि मनोहर जोशी राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. मात्र तेव्हा राज ठाकरेंच्या समर्थकांनी राऊतांची गाडी पेटवून दिली. मनसेच्या स्थापनेनंतर मात्र राऊतांनी सामनातून शिवसेनेच्या भूमिकेला अजून धारदार केलं आणि हळूहळू ते उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले नेते बनले. मात्र तरीही राऊतांनी मांडलेल्या भूमिकांवर अनेकदा शिवसेना नेतृत्वानं हात झटकले, हे विसरुन चालत नाही.

राऊतांच्या अनेक अग्रलेखांनीही शिवसेनेला कोंडीत पकडल्याची उदाहरणं आहेत. बुरखाबंदीचा अग्रलेख असो, नाहीतर मग, 2009 मध्ये मनसेला मिळालेल्या यशावर मराठी माणसांनी सेनेच्या पाठित खंजीर खुपसल्याचा अग्रलेख. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनीही या अग्रलेखांवर ही शिवसेनेची भूमिका नसल्याचा खुलासा केला.

सामनाच्या पुरवणीत छापून आलेलं एक कार्टून हे मराठा मोर्चाशी जोडलं गेलं. तेव्हा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे माफी मागावी लागली. मात्र संजय राऊत शेवटपर्यंत त्या कार्टूनचा मोर्चाशी कुठलाही संबंध नसल्याचं सांगत राहिले.

मात्र, याच सामनातून संजय राऊतांनी राजकीय इनिंग सुरु झाली. लोकप्रभा साप्ताहिक, लोकसत्तेत राऊतांनी बराच काळ क्राईम वार्ताहर म्हणून काम केलं. गँगवार हा शब्द राऊतांनीच जन्माला घातला. मुंबई अंडरवर्ल्डशी निगडीत अनेक घटनांचे राऊत साक्षीदारही राहिले.

लोकसत्तेत असतानाच माणसं पारखण्यात वाकबगार असलेल्या बाळासाहेबांच्या नजरेत संजर राऊत पडले. बाळासाहेबांनी थेट क्राईम बीट सांभाळणाऱ्या एका तरुणाला सामनाचा कार्यकारी संपादक बनवलं. तेव्हा अनेक पत्रकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मूळ अलिबागचे असणारे संजय राऊत आता वयाच्या साठीत आहेत. आजही एकत्रित कुटुंब पद्धती रमणाऱ्या राऊतांना पूर्वशी आणि विदीता या दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या मुंबईतच शिक्षिका आहेत. कला शाखेचे पदवीधर असणाऱ्या राऊतांचं पत्रकारितेचं कुठलंही शिक्षण झालं नाही. मात्र सामना हे वृत्तपत्र आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत ठेवण्यात राऊतांचंच योगदान आहे.  सिनेमाचंही कुठलंही तंत्र ते शिकले नाहीत. मात्र बाळकडू, ठाकरे यासांरखे सिनेमे बनवल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आणि ठाकरे सिनेमाचा सिक्वलही ते बनवत आहेत.

राऊतांच्या भूमिकेबाबत, त्यांच्या विधानांबाबत विरोधकांमध्ये आणि शिवसेनेतही दुमतं आहेत. मात्र त्यांच्या निष्ठेवर शंका घेणारा एकही नाही. सामनातलं प्रत्येक वाक्य आणि तोंडातला प्रत्येक शब्द ते शिवसेनेसाठी लिहितात आणि शिवसेनेसाठीच मांडतात, हे नाकारुन चालत नाही.

जागावाटपात शिवसेना छोटा भाऊ झाला, निवडणुकीतही कमी जागा आल्या. मात्र, राऊतांनी शिवसेनेचा बाणा ऐटीत ठेवला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक डावपेचाचा पहिला सामना हा राऊतांशीच होतो. त्यामुळे सत्तापेचाच्या या वाटाघाटीत या घडीपर्यंत तरी शिवसेनेच्या या चाणक्यानं सर्व डाव नीटपणे खेळले आहेत.

क्रिकेट मॅचमध्ये कॅप्टनला डावाला आकार द्यायचा असतोच, मात्र सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणं, हे जसं ओपनरचं काम असतं. तेच काम संजय राऊत मोठ्या खुबीनं करतात. आता त्या ओपनिंग स्कोरचं चीज कसं करायचं हे शिवसेनेच्या कॅप्टनला ठरवायचं आहे.

VIDEO :

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?