AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार की याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी आज केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं आहे. आजच्या वक्तव्यामुळे शरद पवार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शरद पवारांनी […]

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार की याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी आज केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं आहे. आजच्या वक्तव्यामुळे शरद पवार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. खुद्द शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. माझी इच्छा नाही, पण विचार करु”

शरद पवार यांनी एकीकडे इच्छा नाही असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे विचार करु असंही म्हटल्याने पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. दुसरीकडे अजित पवारांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात लढण्याची गरज नाही, माझ्याकडे 5-6 प्रबळ दावेदार आहेत, असं शरद पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अजित पवारांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण वाचले, संसदेच्या सभ्यतेला हरताळ फासणारे भाषण होतं, मोदी त्यांच्यावर जसे संस्कार आहेत त्याला सुसंगत बोलले, असा घणाघात केला.

लोकसभेसोबत विधानसभा एकत्र झाली, तर महाराष्ट्राच्या जनतेची सात महिनेआधी सुटका होईल, असं पवार म्हणाले. तर अण्णा हजारे यांचे उपोषणाबाबत बोलताना पवारांनी त्या बातम्या वाचणे, पाहणे गेली 2 वर्षे सोडून दिल्याचं सांगितलं.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या 

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?  

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...