सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा थेट सवाल

| Updated on: Nov 05, 2022 | 2:47 PM

आम्ही एकलव्या सारखेच राहिलो आहोत. नुसता फोटो पाहून पूजा करून 1990 पासून तुमच्यासोबत होतो. निवडून आल्यानंतर तुम्ही मला परत कधी विचारलं नाही.

सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा थेट सवाल
सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात?; गुवाहाटीला गेलेल्या आमदाराचा थेट सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुक्ताईनगर: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झडत आहेत. सुषमा अंधारे यांनी सभांचा सपाटा लावत शिंदे गटावर जोरदार हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे शिंदे गटात (shinde camp) खळबळ उडाली आहे. जळगावात तर सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने त्यावरूनही राजकारण तापलेलं आहे. अंधारे यांच्या सभांचा धसका घेतलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी आता थेट त्यांच्या सभांवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सुषमा अंधारे प्रत्येक सभेच्या किती पेट्या घेतात असा सवाल शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे.

शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा सवाल केला आहे. सुषमा अंधारे या स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही श्रीराम प्रभूला मानतो. कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना साक्षात्कार कसा झाला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात? तुम्हाला प्रत्येक सभेसाठी किती पेट्या मिळतात याची महाराष्ट्रभर चर्चा आहे. सभेसाठी पेट्या घ्यायच्या आणि सभा करायच्या अशी चर्चा राज्यात आहे, असंही ते म्हणाले.

पक्ष वाढवण्यासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या. आमच्यासाठी कोणी मुंबईहून आला नव्हता. आम्ही घरावर तुळशीपत्रं ठेवून पक्ष वाढवला. आधीच आमच्यावर विरोधक टीका करत आहेत. आता आणखी एक विरोधक जोडला गेला, असं त्यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे यांच्यामुळे नीलम गोऱ्हे यांना बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यांपूर्वी पक्षात आलेली बाई प्रत्येक स्टेजवर जाऊन कशा प्रकारे वक्तव्य करत आहे. नीलम गोऱ्हे पक्षात आहेत हे लक्षात असू द्या, असा चिमटा त्यांनी काढला.

सुषमा अंधारे यांना संसदीय विचार मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही जे प्रश्न विचारले असते त्याचे उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. तुमच्यासारखे आम्ही काल-परवा पासून पक्षात काम करत नाही. तीस वर्षापासून मी काम करतोय.

एखाद्या मतदार संघात तुमच्यासारखे चारशे मतं घेणारा मी नाही. भाषण करताना एखाद्याचा बाप काढला जातो. एखाद्याची जात काढली जाते. हे थांबवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

मुक्ताई नगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे. आधीही उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. त्यावेळी ते पक्षाचे कुटुंबप्रमुख होते. शेवटच्या माणसाला काय त्रास होता, याची जाणीव त्यांना असायला हवी होती, असं ते म्हणाले.

आम्ही एकलव्या सारखेच राहिलो आहोत. नुसता फोटो पाहून पूजा करून 1990 पासून तुमच्यासोबत होतो. निवडून आल्यानंतर तुम्ही मला परत कधी विचारलं नाही. मातोश्रीला मी शंभर फोन लावले. पण माझ्या एकाही फोनचं उत्तर तुम्ही दिलं नाही. आता तुम्हाला मी दिसतोय का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.