मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे आजही देशातील सर्वच तरुण आणि बुजुर्ग राजकारण्यांसाठी आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यातून, अफाट बुद्धिमत्ता, अभ्यास आणि लोकसंपर्कातून शरद पवारांनी हे वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मागच्यावेळी वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली अन् साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीचा (loksabha election) गेम पालटला. पवारांची ही सभा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. आताही पवारांच्या कर्तव्य निष्ठतेचं हे रुप पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असताना त्यांनी मध्येच डिस्चार्ज घेतला असून थेट पक्षाच्या मेळाव्यासाठी शिर्डीत (shirdi) दाखल झाले आहेत. वयाच्या 81व्या वर्षीही आजाराची पर्वा न करता पवारांनी दाखवलेल्या या उत्साहाची एकच चर्चा सुरू झाली आहे.