Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

भीमराव गवळी, Tv9 मराठी

भीमराव गवळी, Tv9 मराठी | Edited By: महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 11:14 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आज दिनांक 5 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर शिर्डीत सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सभेला संबोधित करणार आहेत. पवार ऑनलाईन संवाद साधणार आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. त्या ऐवजी आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये ओला दुष्काळाची पाहणी करणार आहेत. मुंबईसह देशभरातील सीएनजी पीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाईत आणखी एक फटका नागरिकांना बसला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Nov 2022 06:49 PM (IST)

  सिल्लोडमधील सभेच्या ठिकाणची पाहणी

  Marathi News LIVE Update

  सिल्लोडमधील सभेच्या ठिकाणची पाहणी

  कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

  श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी

  जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार सभा

 • 05 Nov 2022 05:25 PM (IST)

  बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम लवकरच

  Marathi News LIVE Update

  बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम लवकरच

  2023 च्या अखेरीस पर्यंत स्मारकाचं पूर्ण होणार

  बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सादरीकरण

  स्मारकाबाबत सर्व परवानग्या घेतल्या

  पहिल्या टप्प्याचं काम मे महिन्यात पूर्ण होणार

 • 05 Nov 2022 03:42 PM (IST)

  पनवेल मनसे उपशहराध्यक्षावर हल्ला

  उपशहर अध्यक्ष मनोज कोठारी यांच्यावर जीवघेणा हल्ला

  पहाटे 3 वाजता एका हॉटेल बाहेर केला हल्ला

  हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

  आपल्याच पक्षातील कार्यकर्ता आणि अन्य दोघांनी केला हल्ला

  पद न मिळाल्याने राग आल्याने मारहाण केल्याचा फिर्यादीचा आरोप

  मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यावर उपचार सुरू

 • 05 Nov 2022 03:03 PM (IST)

  राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत

  Marathi News LIVE Update

  राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत

  उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने मध्यावधीच्या चर्चा

  ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

  बैठकीदरम्यान ठाकरेंचे भाकीत, सूत्रांनी दिली माहिती

 • 05 Nov 2022 02:31 PM (IST)

  नाना पटोलेंचं मन दुखावलं असल्यास शब्द मागं घेतो

  Marathi News LIVE Update

  नाना पटोलेंचं मन दुखावलं असल्यास शब्द मागं घेतो

  चंद्रकांत खैरे यांनी केली दिलगिरी व्यक्त

  फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत

  असे वक्तव्य करुन खैरेंनी उडवून दिली होती खळबळ

  काँग्रेसने या वक्तव्यावर व्यक्त केली होती नाराजी

 • 05 Nov 2022 01:52 PM (IST)

  शरद पवारांचं शिर्डीत आगमन

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिर्डी हेलिपॅडवर आगमन

  राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरास पवारांची उपस्थिती

  शिबीरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित

  शिबीरात राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती

  अजित पवार मात्र आज काही कारणास्तव अनुपस्थित

  पवारांची तब्येत ठिक नसताना पोहचले शिर्डीत

  डॉक्टरांनी 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असताना शिबीरास उपस्थिती

  थोड्याच वेळात करणार कार्यकर्त्यांना संबोधित

 • 05 Nov 2022 01:14 PM (IST)

  अजित पवारांनी 48 तासाचं सरकार केलं ती बेईमानी नव्हती का?, शंभुराज देसाई यांचा सवाल

  अजितदादांचं भाजपसोबत जाणं ही पक्षप्रमुख शरद पवार आणि पक्षाशी बईमानी नव्हती का?

  पहाटे शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होत का?

  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा अजित पवार यांना सवाल

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरील टीका सहन केली जाणार नाही

  राष्ट्रवादी कॉग्रेस - भाजपा एकत्र येणार होती याबाबत अधिक माहिती गुलाबराव पाटील यांना असावी. त्यांच्या बोलणयात तथ्य आहे

 • 05 Nov 2022 12:15 PM (IST)

  अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट्स तुटणार

  दापोलीतील रिसॉर्ट तोडकाम संबंधात 9 सदस्यांची नियंत्रण समिती स्थापन

  समितीत जिल्हाधिकारी, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा मंत्रालयाचे सदस्य असणार.

  बांधकाम निष्कासन, ढिगारा वाहतूक आणि विल्हेवाट लावणे यासह क्षेत्र पुनर्संचयित करणे/ आसपासच्या वातावरणाच्या अनुषंगाने क्षेत्र विकसित करणे इत्यादी कामाबाबतची समिती.

  पुढच्या 90 दिवसात हे रिसॉर्ट जमीन दोस्त झालेले असणार

 • 05 Nov 2022 12:13 PM (IST)

  महाठग सुकेश चंद्रशेखर याचा पुन्हा लेटर बॉम्ब

  आम आदमी पक्षाला फंड दिल्याची सुकेश याची माहिती

  2017 साली आप पक्षाच्या एका जेवनाच्या कार्यक्रमालाही मी हजर होतो

  जेलमध्ये असतानाही सुकेश चंद्रशेखर याचा पुन्हा दुसरा लेटर बॉम्ब

  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्याबाबत सुकेशचे पुन्हा आरोप

 • 05 Nov 2022 11:03 AM (IST)

  नद्यांचे पाणीवाटप, सीमावादाचे प्रश्न अंतिम अधिकार संसदेकडे- बापट

  दोन राज्याच्या राज्यपालांची भेट योग्य, मात्र अधिकार संसदेकडे

  घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचे मत

  नद्यांचे पाणीवाटप, सीमावादाचे प्रश्न अंतिम अधिकार संसदेकडे

  महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कर्नाटकच्या राज्यपालांच्या भेटीवर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया

 • 05 Nov 2022 10:24 AM (IST)

  पुणे - नाशिक दरम्यान 180 किलोमीटरचा 10 पदरी एक्सप्रेस वे होणार

  पुणे - नाशिककरांसाठी खुशखबर

  पुणे - नाशिक दरम्यान 180 किलोमीटरचा 10 पदरी एक्सप्रेस वे होणार

  महामार्गावरून प्रवास आता जलदगतीने होणार

  एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई दरम्यानच्या हायवे रोडच्या धर्तीवर बांधला जाणार

  एक्सप्रेस वे जुन्नर,खेड, संगमनेर,सिन्नरमधून जाणार

 • 05 Nov 2022 09:51 AM (IST)

  जपानमधील सुमिटोमो कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुक करणार

  2 हजार 667 कोटींची गुंतवणुक केली जाणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

  कंपनीचे 500 कोटीचे बीकेसी मुंबई इथं आँफिस होणार

  या माध्यमातून 3 हजार लोकांना थेट नोकरीची संधी मिळेल

  या कंपनीच्या प्रकल्पासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

  या कंपनीच्या निविदा या आगोदर रद्द का झाल्या यावरून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरेंवर सामंताचा निशाणा

 • 05 Nov 2022 09:49 AM (IST)

  कोण होणार भाजपचा औरंगाबाद शहराध्यक्ष

  शहराध्यक्ष पदावरून औरंगाबाद भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

  तीन ते चार जणांमध्ये शहराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू

  समीर राजूरकर, राजू शिंदे आणि प्रमोद राठोड यांच्यात रस्सीखेच सुरू

  चढाओढीमुळे गेल्या एक महिन्यापासून शहराध्यक्ष पदाची निवड प्रलंबित

  रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि अतुल सावे या तिघांची प्रतिष्ठा पणाला

 • 05 Nov 2022 09:48 AM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपचे शक्तीप्रदर्शन

  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात करणार विविध बैठका

  दिवसाची सुरुवात बाईक रॅली पासून होणार

  थोड्याच वेळात बाईक रॅली सिंघानिया शाळे जवळून सुरू होणार

  संध्याकाळी मोठा कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात येणार

  दरम्यान दिवसभर विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बावनकुळे घेणार

  येणाऱ्या पालिका निवडणुकांचा पार्श्भूमीवर आजचा दौरा महत्त्वपूर्ण

 • 05 Nov 2022 09:46 AM (IST)

  औरंगाबादेत रुग्णालयाची तोडफोड

  औरंगाबाद येथील इंटरनॅशनल हॉस्पिटलची केली तोडफोड

  रुग्णाकडे रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी केली तोडफोड

  रात्री तोडफोड झाल्याने रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमा

  पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

 • 05 Nov 2022 09:45 AM (IST)

  नाशिकमध्ये हावडा एक्सप्रेसच्या इंजिनला आग

  नाशिक रोड रेल्वे स्थानक वर प्लॅटफॉर्म 3 वर घडली घटना

  प्लॅटफॉर्मवर गाडी उभी असताना अचानक आग लागल्याने गोंधळ

  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

  आज विझविण्याचे काम सुरू. आगीचे कारण मात्र अस्पष्ट

  सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

Published On - Nov 05,2022 9:42 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI