अखेर आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील सभा रद्द; आता सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Nov 05, 2022 | 9:24 AM

आदित्य ठाकरे यांना इतर ठिकाणी सभा घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आदित्य यांनी इतर ठिकाणी सभा घेण्यास नकार देऊन सभाच रद्द केली.

अखेर आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील सभा रद्द; आता सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला 'हा' निर्णय
अखेर आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील सभा रद्द; आता सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला 'हा' निर्णय
Image Credit source: tv9 marathi

औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द (rally) झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीच ही सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्यासाठी ही मोठी चपराक असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांची औरंगाबादच्या सिल्लोड येथे सभा होती. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच ही सभा होती. त्याच दिवशी आणि त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मैदानात शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा होती. त्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांना सभेची परवानगी नाकारली होती.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची सभा सिल्लोडमधील आंबेडकर चौकात होणार होती. तर श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपीच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही मैदाने समोरासमोर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.

आदित्य ठाकरे यांना इतर ठिकाणी सभा घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आदित्य यांनी इतर ठिकाणी सभा घेण्यास नकार देऊन सभाच रद्द केली. त्याऐवजी सभा न घेता आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरूनच साधणार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सभा रद्द करून आदित्य ठाकरे ओला दुष्काळाची पाहणी करणार आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे दुष्काळाची पाहणी करणार आहेत. एकीककडे सत्तार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत स्टेजवरून भाषण करत असतील तर दुसरीकडे आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत असतील. त्यामुळे सत्तार यांची चांगलीच कोंडी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI