AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युतीचे साईड इफेक्ट्स! शिवसेना आमदार काँग्रेसच्या वाटेवर?

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत. चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास, विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसेल. धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेसप्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचे ‘साईड इफेक्ट्स’ असल्याची चर्चा आहे. आमदार बाळू धानोरकर हे लवकरच काँग्रेसमध्ये […]

युतीचे साईड इफेक्ट्स! शिवसेना आमदार काँग्रेसच्या वाटेवर?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत. चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास, विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसेल. धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेसप्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचे ‘साईड इफेक्ट्स’ असल्याची चर्चा आहे.

आमदार बाळू धानोरकर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवाय, ते काँग्रेसमधून चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही विदर्भातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे आपला आमदार पक्ष सोडत असल्याचा शिवसेनेला फटका आणि धानोरकरांनी लोकसभा लढवल्यास युतीला फटका, असा दुहेरी फटका आमदार बाळू धानोरकरांनी सेना सोडल्यास बसणार आहे.

विशेष म्हणजे, आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना आणि भाजप युतीमुळे नाराज असल्याची चर्चा आहे. आधी स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती केली. या युतीमुळे शिवसेनेच्या गोटात नाराजांची मोठी फौज निर्माण झाल्याची चर्चा आहे.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ