AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना५४ | शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही (Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)

शिवसेना५४ | शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरे पक्षाची पुढील वाटचाल सांगणार
| Updated on: Jun 19, 2020 | 9:02 AM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. (Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहेच, आता इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

54 वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करतील.

मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने गेल्या 54 वर्षात महाराष्ट्रासह देशभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. 1995 मध्ये युती सरकारनंतर आज 25 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. त्यामुळे यावर्षी शिवसेनेने मोठ्या जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोना विषाणुंच्या संसर्गामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना या काळात शंभर टक्के समाजकारण करण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा : शिवसेनेला पदाचा मोह नाही हे खरंय, त्यांचा त्याग मोठा : सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Shivsena Foundation Day Uddhav Thackeray)

(Shivsena 54th Foundation Day Uddhav Thackeray Live Updates)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.