AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतून आलेल्या आमदारामुळे नाराज, शिवसेनेचा माजी आमदार राष्ट्रवादीत?

शहापूर मतदारसंघातून पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले दौलत दरोडा आता राष्ट्रवादीत जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

राष्ट्रवादीतून आलेल्या आमदारामुळे नाराज, शिवसेनेचा माजी आमदार राष्ट्रवादीत?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 30, 2019 | 11:38 AM
Share

ठाणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधीपक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा झेंडा हाती घेतला होता. राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आलेले पांडुरंग बरोरा शिवसेनेत आल्यामुळे सेनेचे माजी आमदार दौलत दरोडा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच दरोडा (Shivsena Ex MLA Daulat Daroda) आता राष्ट्रवादीच्या गोटात सामील होण्याची चिन्हं आहेत.

दरोडा यांनी पक्षांतर केल्यास शहापूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शहापूरमध्ये शिवसेनेची ताकद बघून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीसोबत असलेले 40 वर्षांचे संबंध तोडून शिवसेनेत आले. पांडुरंग बरोरा एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. परंतु 15 वर्ष शिवसेनेचं आमदारपद भूषवलेले माजी आमदार दौलत दरोडा आणि त्यांचे समर्थक यामुळे खंतावले आहेत.

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश

पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले दौलत दरोडा (Shivsena Ex MLA Daulat Daroda) आता राष्ट्रवादीत जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. दरोडांप्रमाणे शिवसेनेत एकापेक्षा एक उमेदवार असताना पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेत का घेतलं गेलं, यामुळे शिवसैनिकांत प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.

कोण आहेत दौलत दरोडा?

  • दौलत दरोडा यांनी तीन वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी राखली आहे.
  • 2009 मध्ये दौलत दरोडा यांनी पांडुरंग बरोरा यांच्यावर विजय मिळवला होता.
  • 2014 मध्ये बरोरा यांच्याकडूनच दरोडा यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे कट्टर विरोधक पक्षात आल्यामुळे दरोडा नाराज होते.

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

  • आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार होते.
  • बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादीशी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध.
  • पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार होते.

पांडुरंग बरोरा यांनी 10 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात शिवबंधन बांधलं होतं. शहापूर तालुका टंचाईमुक्त आणि विधानसभा भगवा युक्त करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले होते.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली