AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी सुभाष साबणे यांनी केली आहे. (Shivsena Nanded Subhash Sabane)

पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर
उद्धव ठाकरे, सुभाष साबणे, अशोक चव्हाण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 07, 2021 | 8:22 AM
Share

नांदेड : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur By Poll Result) निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या (Deglur) पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणेंनी दिला आहे. (Shivsena Former MLA Nanded Deglur Subhash Sabane warns to join BJP)

नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.

दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.

कोण आहेत सुभाष साबणे?

सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.

कोण होते रावसाहेब अंतापूरकर?

सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

कोरोनाच्या काळातही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत

आता साबणे यांनी उमेदवारीसाठी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन

जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं

(Shivsena Former MLA Nanded Deglur Subhash Sabane warns to join BJP)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती