AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यास भाजप नेत्यांचाच विरोध, मोठा गट वरिष्ठांच्या भेटीला

सानप यांना विरोध करण्यासाठी भाजपातील एक गट जाणार वरिष्ठांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेच्या बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यास भाजप नेत्यांचाच विरोध, मोठा गट वरिष्ठांच्या भेटीला
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:55 PM
Share

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप (ShivSena leader Balasaheb Sanap) यांच्या संभाव्य भाजप (Bjp) प्रवाशाने भाजपात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानप यांच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे सानप यांना विरोध करण्यासाठी भाजपातील एक गट जाणार वरिष्ठांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण आता भाजपमध्ये सानप यांच्या येण्यामुळे नाराजी असल्याचं समोर येत आहे. (ShivSena leader Balasaheb Sanap BJP leaders will go to meet the seniors to oppose Sanap)

खरंतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात सानप यांना पक्षात थोपवून धरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आल्याचंही बोललं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सानप यांनी चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

इतकंच नाही तर त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याने ऐन नाशिक पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात होणारी बंडाळी थोपविण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. त्यामुळे सानप यांना पक्षात आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खिळ बसल्याचंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

सानप यांना भाजपमध्ये खेचण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पराभवाला सामोरे जावं लागल्याने सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिकच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सानप यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शिवाय नाशिक पालिकेतील भाजपच्या सत्तेला सानप सुरुंग लावतील अशी आशा होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे सानप हे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणात नव्हते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे नाशिक पालिकेतील सत्ता हातातली जाण्याची शक्यता असल्याने सानप यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सानप यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावेळी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने चर्चा झाली असून उद्धव ठाकरे यांनी सानप यांच्याकडे मोठी जबाबदारी देणार असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीसह महामंडळाचं अध्यक्षपद देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी सानप यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

टार्गेट पंचवटी

सानप हे पंचवटीमध्ये राहतात. या भागात एकूण 24 नगरसेवक असून यात शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक आहे. त्यामुळे सानप यांच्या माध्यमातून पंचवटीतून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचंही सांगण्यात येतं. या भागातील मनसे आणि भाजपचं आव्हान मोडून काढण्यासाठी सानप चांगली भूमिका वठवू शकतात, त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाकडून अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ShivSena leader Balasaheb Sanap BJP leaders will go to meet the seniors to oppose Sanap)

संबंधित बातम्या – 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी साधणार संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता

ओबीसी जनगणना ते राष्ट्रवादीतील इनकमिंग; छगन भुजबळांची 6 मोठी वक्तव्ये

(ShivSena leader Balasaheb Sanap BJP leaders will go to meet the seniors to oppose Sanap)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...