AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक?

इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ खासदार धैर्यशील माने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले (Dhairyasheel Mane office inauguration)

धैर्यशील मानेंच्या कार्यालय उद्घाटनाला भाजप कार्यकर्ते, कोल्हापुरात शिवसेना-भाजपची जवळीक?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 26, 2021 | 2:42 PM
Share

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Shivsena MP Dhairyasheel Mane office inauguration attended by BJP workers)

इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ खासदार धैर्यशील माने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला धैर्यशील मानेंसह माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश हळवणकर, मदन कारंडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक स्वामी, रवींद्र माने, हरिष बोहरा, महादेव गौड उपस्थित होते.

शिवसेनेच्या माजी आमदारासह भाजप कार्यकर्ते

सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे शहरात दिवसभर या गोष्टीची चर्चा रंगली होती.

कोल्हापूर महापालिकेत भाजप-सेना युती?

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार आहे, तर भाजप विरोधात आहे. मात्र इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे भविष्यात शहर पातळीवर एकत्र येणार का? असा सवाल निर्माण झाला होता.

इचलकरंजी शहरातील समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी उपस्थिती लावली होती.

कोण आहेत धैर्यशील माने?

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचा युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. धैर्यशील माने यांनी तब्बल 93 हजार 785 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतरही धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला होता. थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद मानेंनी घेतला होता. (Shivsena MP Dhairyasheel Mane office inauguration attended by BJP workers)

कोल्हापूर महापालिका निवडणुकीचं चित्र काय?

कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना गेल्या महिन्यात पाहायला मिळाल्या होत्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक (Kolhapur Municipal Corporation Election) स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. शिवसेनेने स्वबळाची भाषा आधी केल्याचा दावा सतेज पाटल्यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये ठिणगी उडाली होती.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्तांचं ओझं खांद्यावर, खासदार धैर्यशील मानेंनी ट्रकमधील पोती स्वतः उतरवली

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर, ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर भडकले

(Shivsena MP Dhairyasheel Mane office inauguration attended by BJP workers)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...