AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोरातांना निकालाच्या दिवशी महाराष्ट्रात फिरायला मोकळं करू: सुजय विखे

महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Sujay Vikhe criticize Balasaheb Thorat) यांच्यावर सडकून टीका केली.

थोरातांना निकालाच्या दिवशी महाराष्ट्रात फिरायला मोकळं करू: सुजय विखे
| Updated on: Oct 09, 2019 | 3:20 PM
Share

अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Sujay Vikhe criticize Balasaheb Thorat) यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “आता मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Sangamner) हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Sangamner) यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

संगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे, असाही दावा सुजय विखेंनी केला. महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं.

लोकसभा निवडणुकीत संगमनेरमधून आपल्याला 13 हजार मतांची आघाडी मिळाल्याचंही विखेंनी नमूद केलं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं.

आम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, असे आश्वासनही दिले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.