AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ अदृश्य हातांत काहीतरी दडलंय? सरकारची काहीतरी तडजोड? म्हणून मंत्री गप्प…. सुप्रिया सुळेंनी कोणती शक्यता बोलून दाखवली?

यामागे अदृश्य हात आहे. त्यांना महाराष्ट्राला कमी दाखवायचा. अपमान होताना आनंद मिळतोय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

'त्या' अदृश्य हातांत काहीतरी दडलंय? सरकारची काहीतरी तडजोड? म्हणून मंत्री गप्प.... सुप्रिया सुळेंनी कोणती शक्यता बोलून दाखवली?
Image Credit source: social media
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2022 | 10:14 AM
Share

मुंबईः महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातोय. इथल्या महापुरुषांबद्दल अपशब्द बोलले जात आहेत. कर्नाटक सरकार (Karnataka Government) महाराष्ट्रावर मुजोरी करतोय, पण महाराष्ट्रातलं सरकार (Maharashtra Govt) मूग गिळून बसलंय. यामागे लोक म्हणतात तसं नक्की काहीतरी गूढ आहे. त्या अदृश्य हातांना सरकारबद्दल असं काही तरी माहिती आहे, त्यामुळेच सरकार शांत आहे. कोणती तडजोड करून हे सरकार आलंय, हे अदृश्य हातांना माहिती असावं, अशी शक्यता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारने शिंदे-भाजप सरकारविरोधात काढलेल्या मोर्चात आज खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांवर भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना सुळे यांनी ही मोठी शक्यता व्यक्त केली.

मुंबईत टीव्ही 9 शी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपची एक संस्कृती होती. यापूर्वीच्या नेत्यांची भाषणं ऐकण्यासारखी असत. प्रमोदजी, सुषमाजी, अरुणजी यांची भाषणं आम्ही आवर्जून ऐकायचो. ते उत्तम वक्ते होते.

ज्या पद्धतीने ते मुद्दे मांडायचे. तेव्हा आपलंही भाषण कधीतरी असावं, असं आमच्या मनात यायचं… पण ज्या पक्षाला एवढी शिस्त होती. त्या पक्षाला काय झालंय माहिती नाही. सुसंस्कृत होता, तसा राहिलेला नाही. सत्ता येते जाते. राज्याची आणि देशाची संस्कृती राहिली पाहिजे. तशी आज राहिलेली नाही, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

केंद्रातील भाजप सरकार राज्यपालांविरोधात कारवाई का करत नाही, याचं उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ यामागे अदृश्य हात आहे. त्यांना महाराष्ट्राला कमी दाखवायचा.

अपमान होताना आनंद मिळतोय. महापुरुषांचा अपमान होतो तरीही सरकार अशा लोकांची पाठराखण करते. सीमाप्रश्नावरही काहीच बोललं जात नाही. गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेल्या. कदाचित हे सरकार तडजोड करून आलंय.

त्या अदृश्य हाताकडे ही माहिती असेल. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची तडजोड त्यांना माहिती असेल. काहीतरी मोठं माहिती आहे का… अशा शक्यता चर्चा समाजात होत असते, ते कदाचित खरही असू शकतं, असं वक्त्वय सुप्रिया सुळे यांनी केलंय.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा