देशातील ‘या’ एकमेव मतदारसंघाचा निकाल लागणार नाही

| Updated on: May 22, 2019 | 7:20 PM

चेन्नई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार नाही. तामिळनाडूच्या वेल्लूर या मतदारसंघाचा निकाल यंदा लागणार नाही. कारण, या मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. देशात एकूण 543 लोकसभा मंतदारसंघ आहेत. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये यापैकी 542 जागांवरच निवडणूक पार पडली. वेल्लूरची निवडणूक रद्द का झाली? डीएमकेचे कोषाध्यक्ष दुरईमुर्गन यांचा मुलगा कथिर […]

देशातील या एकमेव मतदारसंघाचा निकाल लागणार नाही
Follow us on

चेन्नई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार नाही. तामिळनाडूच्या वेल्लूर या मतदारसंघाचा निकाल यंदा लागणार नाही. कारण, या मतदारसंघाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. देशात एकूण 543 लोकसभा मंतदारसंघ आहेत. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये यापैकी 542 जागांवरच निवडणूक पार पडली.

वेल्लूरची निवडणूक रद्द का झाली?

डीएमकेचे कोषाध्यक्ष दुरईमुर्गन यांचा मुलगा कथिर आनंद हा वेल्लूर मतदारसंघातून उमेदवार होते. गेल्या 30 मार्चला स्थानिक प्रशासनाच्या तक्रारीवर कारवाई करत आयकर विभागाने दुरईमुर्गन यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर डीएमकेचे आणखी एक बडे पदाधिकारी दामोदरन यांच्या सिमेंटच्या गोडाऊनवरही छापा टाकण्यात आला. या छाप्यात आयकर विभागाने तब्बल 11 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर 8 एप्रिलला निवडणूक आयोगाने उमेदवार कथिर आनंदसह त्याच्या दोन खास लोकांविरुद्ध तसेच, सिमेंट गोडाऊनचा मालक दामोदरन आणि पूनजोलई श्रीनिवासन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पूनजोलई श्रीनिवासन यांनी हा पैसा त्यांचा असल्याचं कबुल केलं. सोबतच हा पैसा मतदारांमध्ये वाटण्यासाठी असल्याचंही पूनजोलई श्रीनिवासन यांनी सांगितलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने 14 एप्रिलला वेल्लूरची निवडणूक रद्द करण्याची शिफारस केली. यावर 16 एप्रिलला राष्ट्रपतींच्या आदेशावर वेल्लूरची निवडणूक रद्द करण्यात आली. निवडणूक रद्द झाल्यानंतर मोठा वाद उफाळला. कथिर आनंद याने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवला की, वेल्लूरमध्ये निवडणूक घ्या, नाहीतर ते कायदेशीर कारवाई करतील.

तामिळनाडूत ‘कॅश फॉर व्होट’ची फॅशन

तामिळनाडूमध्ये ‘कॅश फॉर व्होट’ची फॅशन तशी जूनी आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये 500 कोटी रुपये जप्त करण्यात आले. यापैकी 205 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणूक 2016 मध्येही पैसे वाटपामुळे तंजावूर आणि अराकिरुची येथील निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकांमध्ये पैसे सापडल्याने त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.

संबंधित बातम्या :

निकालानंतर हिंसाचाराची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?

EVM वर शंका उपस्थित करणाऱ्या 22 पक्षांना अमित शाहांचे 6 प्रश्न

मी इंजिनिअर, त्यामुळे सांगू शकतो EVM हॅकिंग अशक्य : पृथ्वीराज चव्हाण