पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं. बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा …

पंतप्रधान मोदींच्या पुढील कॅबिनेट बैठकीची तारीखही ठरली?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा पूर्ण विश्वास आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी मोदींनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. लोकांच्या या समर्थनामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचं मोदींनी मंत्र्यांना सांगितलं.

बैठकीत मोदींनी निवडणुकीनंतरच्या प्रक्रियेबाबत सांगितल्याचीही माहिती आहे. निकालानंतर पुन्हा एकदा 25 मे रोजी कॅबिनेट बैठकीची गरज पडेल, असं मोदी म्हणाल्याची माहिती आहे. त्यामुळे कॅबिनेटची बैठक निकालानंतर दोन दिवसातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी जेव्हा बैठकीत प्रचारादरम्यान लोकांनी दिलेल्या प्रेमाविषयी सांगत होते तेव्हा भावूकही झाले. 24 तारखेला सर्व निकाल हाती आल्यानंतर 25 मे रोजी पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकीची गरज पडेल. या बैठकीत सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्याचीही माहिती आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा आढावा घेण्यात आला. मोदींनी यापूर्वीच पुढील 100 दिवसांचा प्लॅन तयार केल्याचंही सांगितलं जातंय. नवीन सरकार आल्यानतंर नियोजनातच जास्त वेळ जातो. त्यामुळे हे नियोजन केल्याची माहिती आहे.

एनडीएच्या बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोलप्रमाणेच 23 मे रोजी भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असं सांगण्यात आलं. या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी, एलजेपी प्रमुख रामविलास पासवान, अकाली दल प्रमुख प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांची उपस्थिती होती.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *