AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar Oath : देवेंद्र फडणवीस शपथविधीला हजर राहणार, तेजस्वींनी निमंत्रण नाकारलं

नितीश कुमार (Nitish Kumar) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत

Nitish Kumar Oath : देवेंद्र फडणवीस शपथविधीला हजर राहणार, तेजस्वींनी निमंत्रण नाकारलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 16, 2020 | 12:52 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप- संयुक्त जनता दलाने (BJP JDU) आज मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचं (Oath taking ceremony) आयोजन केलं आहे. या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हजर राहणार आहेत. मात्र बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी शपथविधीचं निमंत्रण स्वीकारलेलं नाही. (Tejashwi Yadav not to attend Nitish Kumars Oath taking ceremony)

नितीश कुमार (Nitish Kumar) सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत, तर जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळवलेल्या भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदं पदरात पाडून घेतली आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी भाजपने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रिपदं देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्गजांना निमंत्रण, तेजस्वींचा नकार

नितीश कुमार यांचा शपथविधी संध्याकाळी 4.30 वाजता राजभवनात होणार आहे. या सोहळ्याला दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी शपथसोहळ्याला येण्यास नकार दिला आहे. मात्र त्याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

यापूर्वी तेजस्वी यादवांनी बिहार निवडणूक मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. बिहारमध्ये 10 नोव्हेंबरला मतमोजणी झाली. मात्र सुरुवातील आघाडीवर असणारे आरजेडी-काँग्रेस नंतर पिछाडीवर पडले. त्यामुळे तेजस्वी यादवांनी निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे.

शपथविधीला कोण कोण हजर राहणार?

नितीश कुमारांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. याशिवाय भाजप नेते भूपेंद्र यादव, संजय जायस्वाल, नागेंद्र जी, जेडीयू नेते विजय कुमार चौधरी आणि आरसीपी सिंह ही मोठी नावं दिसणार आहेत.

नितीश कुमारांसोबत कोण कोण शपथ घेणार?

बिहार विधानसभेची सदस्य संख्या 243 असून मंत्रिमंडळात एकूण 36 मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात 16 मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. जेडीयूकडून बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, विजय चौधरी, श्रवण कुमार आणि लेसी सिंह यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, प्रेम कुमार, नन्दकिशोर यादव, कृष्ण ऋषि, विजय सिन्हा, राणा रणधीर सिंह, प्रमोद कुमार, रामनारायण मंडल,नीतीश मिश्रा,नितिन नवीन, सम्राट चौधरी, संजीव चौरसिया यांची नावं आघाडीवर आहेत.

विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश सहनी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचे संतोष मांझी शपथ घेणार आहेत.

भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी?

बिहारमध्ये भाजपनं चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार मोदी यांना डच्चू देण्यात आलाय. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुपख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजपने रविवारी तारकिशोर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. रेणूदेवी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुशीलकुमार मोदी यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2020 (Bihar Election result 2020)

बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीएला विजय मिळवला होता. यामध्ये भाजपला 74 तर संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांना 43 जागांवर विजय मिळाला होता.

बिहारमधील पक्षीय बलाबल

  • भाजप – 74
  • जेडीयू – 43
  • आरजेडी – 75
  • काँग्रेस – 19
  • एमआयएम – 05
  • CPI (ML) – 12
  • CPI (अन्य) – 4
  • हिंदुस्तान आवाम मोर्चा – 04
  • विकासशील इन्सान पार्टी – 04
  • अपक्ष/इतर – 03
  • एकूण – 243

(Tejashwi Yadav not to attend Nitish Kumars Oath taking ceremony)

संबंधित बातम्या:

 Nitish Kumar cabinet : बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; भाजपचे चाणक्य अमित शाह सोहळ्याला उपस्थित राहणार

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..