ठाकरे सरकारचा पहिला ‘महाविस्तार’, 26 कॅबिनेट, दहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत.

ठाकरे सरकारचा पहिला 'महाविस्तार', 26 कॅबिनेट, दहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी
अनिश बेंद्रे

|

Dec 30, 2019 | 2:40 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. (Thackeray Govt Cabinet Expansion Live)

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र यड्रावकर यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांना राज्यमंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,2:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दत्तात्रेय भरणे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विश्वजीत कदम यांना मंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,2:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बच्चू कडू यांना मंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,2:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते शंभूराज देसाई यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सतेज पाटील यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अब्दुल सत्तार यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार शंकरराव गडाख यांचा शपथविधी” date=”30/12/2019,2:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”के. सी. पाडवी यांचा शपथविधी, राज्यपालांनी पाडवी यांना दुसऱ्यांदा शपथ घेण्यास सांगितलं” date=”30/12/2019,1:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते उदय सामंत यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,1:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते संदीपान भुमरे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते दादा भुसे यांना शपथ” date=”30/12/2019,1:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ ” date=”30/12/2019,1:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event] [svt-event title=”शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना नेते संजय राठोड यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते सुनिल केदार यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवाब मलिक यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,1:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी घेतली शपथ” date=”30/12/2019,1:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा शपथविधी” date=”30/12/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ” date=”30/12/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शपथविधीला सुरुवात” date=”30/12/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख  – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे मंत्री 

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) अनिल परब – मुंबई (विधानपरिषद) उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई) शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा) बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड) के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख– लातूर शहर (लातूर) सुनिल केदार – सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई) अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

आतापर्यंत बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

पिता मुख्यमंत्री, पुत्र मंत्री, आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार

कोणाकडे कोणती खाती? (Thackeray Govt Cabinet Expansion Live)

छगन भुजबळ (07)

ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण

जयंत पाटील (07)

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

एकनाथ शिंदे (10) गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई (12) उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

बाळासाहेब थोरात (05)

महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम).

नितीन राऊत (06)

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

Thackeray Govt Cabinet Expansion Live

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें