आज बाळासाहेब हवे होते, चंद्रकांत खैरेंचा किस्सा सांगत शरद पवारांकडून आठवण

बाळासाहेब असते तर आज आनंद झाला असता.  लहान कार्यकर्त्यांना त्यांनी मोठी केलं, असं शरद पवारांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. दिवसा एकमेकांचा समाचार घ्यायचो आणि रात्री आम्ही एकत्र संवाद साधायचो, अशी आठव पवारांनी सांगितली.

आज बाळासाहेब हवे होते, चंद्रकांत खैरेंचा किस्सा सांगत शरद पवारांकडून आठवण

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अखेर महाराष्ट्र विकास आघाडी (Maha Vikas Aghadi) हे नाव देण्यात आलं आहे. या आघाडीच्या विधीमंडळ नेतेपदी उद्धव ठाकरे (CM candidate of ‘Maha Vikas Aghadi’ Uddhav Thackeray) यांची निवड झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार (CM candidate of ‘Maha Vikas Aghadi’ Uddhav Thackeray)म्हणून निवडण्यात आली. उद्या त्यावर शिक्कामोर्तब होईल. हॉटेल ट्रायडंटमध्ये  तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.

शरद पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. “बाळासाहेब ठाकरे हे एक असे नेते होते, ते लहानातल्या लहान समाजातील कार्यकर्त्यांसोबत असायचे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ज्या समाजातून आले आहेत, त्या समाजाची लोकसंख्या दोन ते तीन हजार पण नाही पण ते खासदार झाले. अशा अनेक समाजातील कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी घडवले”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब असते तर आज आनंद झाला असता.  लहान कार्यकर्त्यांना त्यांनी मोठी केलं, असं शरद पवारांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही एकमेकांवर टीका करत होतो. दिवसा एकमेकांचा समाचार घ्यायचो आणि रात्री आम्ही एकत्र संवाद साधायचो, अशी आठव पवारांनी सांगितली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. “असा प्रसंग यापूर्वी कधी माझ्यावर आला नाही. पवारसाहेबांनी बाळासाहेबांची आणि माँची आठवण काढली. संघर्षाचा विजय मिळाल्यावर मला बाळासाहेबांची आठवण येते. स्वप्नात पण विचार केला नव्हता की मला काहीतरी व्हायचं आहे. सर्वांचे आभार मानताना  सोनिया गांधीना धन्यवाद देईन, तीन टोकाचे तीन पक्ष एकत्र आले आहेत, मात्र एकमेकांवर विश्वास ठेवून आम्ही एकत्र आलो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तीस वर्ष ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही, पण ज्यांच्यासोबत तीस वर्ष सामना केला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. नेमकं कमावले काय आणि गमावले काय? याचा विचार करणार नाही. आपण सर्व मैदानातली माणसे आहोत, त्यामुळे आखाड्यात उतरल्याने वेगळे काय वाटत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तीन पक्ष वेगळे म्हणून आमचे तुमचे करायचे नाही, हे आपलं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे, हे माझं सरकार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खूप खिळे असतात, जाणारे मुख्यमंत्री आणखी चार खिळे ठोकून जातात, पण तुम्ही सोबत असाल तर ते खिळे मी हातोड्याने ठोकेन. मी घाबरणारा नाही रडणारा नाही तर लढणारा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मातोश्री’त जे आले ते बाहेर जाऊन खोटं बोलतात त्यांची साथ मी कदापी देणार नाही. खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाही. शब्द देताना दहा वेळा विचार कर, दिलेला शब्द पडू द्यायचा नाही, असं बाळासाहेबांनी सांगितलं. मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, शेतकऱ्यांची जी दैना झाली आहे ती मी विसरु शकत नाही, त्यामुळे आपल्याला काम करायचे आहे. कुणी आमच्या आडवे येऊ नका, आडवे आले की आम्ही उत्तर देऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI