नोकरीला लावतो म्हणून 265000 उकळले, वंचितच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 25, 2019 | 4:45 PM

सुशिक्षित तरुणाकडून 2 लाख 65 हजार उकळल्या प्रकरणी धम्मपाल माशाळकर (Dhammapal Mashalkar) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे धम्मपाल माशाळकर (Dhammapal Mashalkar) यांनी विद्यापीठाच्या मुलाखतीसाठी बनावट पत्र दिल्याचा आरोप फसवणूक झालेल्या तरुणाने केलाय.

नोकरीला लावतो म्हणून 265000 उकळले, वंचितच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

सोलापूर : नोकरीचं आमिष दाखवून तरुणाची 2 लाख 65 हजार रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) सोलापूर अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित तरुणाकडून 2 लाख 65 हजार उकळल्या प्रकरणी धम्मपाल माशाळकर (Dhammapal Mashalkar) यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे धम्मपाल माशाळकर (Dhammapal Mashalkar) यांनी विद्यापीठाच्या मुलाखतीसाठी बनावट पत्र दिल्याचा आरोप फसवणूक झालेल्या तरुणाने केलाय.

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील किरण भारत चव्हाण या तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात क्लर्क आणि शिपाई पदासाठी जागा निघाल्या आहेत, असं सांगण्यात आलं. विद्यापीठातील कुलसचिव सोनजे हे माझ्या परिचयाचे आहेत. तिथे तुला नोकरी लावतो. लिपिकाच्या जागेसाठी 5 लाख रुपयांचा रेट सुरू आहे. यातील अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील, असं सांगून किरण चव्हाण यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपये उकळले.

धम्मपाल माशाळकर यांनी मुलाखतीसाठी विद्यापीठाच्या नावे बनावट मुलाखत पत्र पाठवलं. मात्र किरण याने विद्यापीठात जाऊन याबाबत शहानिशा केल्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर किरण यांनी थेट पोलिसात धाव घेऊन धम्मपाल माशाळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. किरण यांच्या तक्रारीनुसार जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 417 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI