AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसंतदादांच्या एका नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दुसरा नातू अपक्ष लढणार

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसच्या वाट्याला येतो. मात्र यावेळी आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सरु झाल्या असल्याने, काँग्रेसला पक्षाअंतर्गत जोरदार धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर आता वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष लढणार […]

वसंतदादांच्या एका नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दुसरा नातू अपक्ष लढणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसच्या वाट्याला येतो. मात्र यावेळी आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सरु झाल्या असल्याने, काँग्रेसला पक्षाअंतर्गत जोरदार धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर आता वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला एकाच दिवशी दोन धक्के बसले आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघ आघाडीकडून स्वाभिमानीला दिला जाणार असल्याने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि वसंतदादा पाटील यांना मानणारे नाराज आहेत.

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर मी निवडणूक लढवायला तयार आहे, लोकसभा निवडणुकीसाठी मी काँग्रेसचा अर्ज भरणार आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये आयोजित वसंत दादा प्रेमी संवाद मेळाव्यात विशाल पाटील यांनी याबाबत घोषणा केली.

प्रतिक पाटलांचा विशाल पाटलांना सल्ला

“मी काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. आताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली नाही. विशाल पाटील काँग्रेसकडून अर्ज भर, जर एबी फॉर्म नाही आला, तर तो अर्ज अपक्ष होतोय, तू अपक्ष म्हणून लढ.” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील  यांनी विशाल पाटील यांना दिला.

प्रतिक पाटील यांचा काँग्रेसला राम राम

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. वसंतदादाचे नाव हाच माझा पक्ष आहे”, असे सांगत प्रतीक पाटीलांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे.

“आत्ताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली आहे का?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

“दिल्लीत जाऊन आम्ही लढायला तयार होतो. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं. त्यानंतर काँग्रेसने लगेच राजू शेट्टी यांना हा मतदारसंघ घ्या असं सांगितलं. सुरुवातीला राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ नको असं सांगितलं होतं”, असेही ते म्हणाले.

Follow Us
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..