AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील हायप्रोफाईल मतदारसंघ, ज्यांच्याकडे देशाचं लक्ष

नागपूर: देशभरात लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. सर्वच मतदारसंघात राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. पण यापैकी हायप्रोफाईल मतदारसंघाकडे अवघ्या देशाच लक्ष लागलं आहे. यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर, या चारंही हायप्रोफाईल लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. विदर्भातील हायप्रोफाईल लोकसभा लोकसभा निवडणुकीत हायप्रोफाईल मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतात. या मतदारसंघातील […]

विदर्भातील हायप्रोफाईल मतदारसंघ, ज्यांच्याकडे देशाचं लक्ष
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

नागपूर: देशभरात लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. सर्वच मतदारसंघात राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. पण यापैकी हायप्रोफाईल मतदारसंघाकडे अवघ्या देशाच लक्ष लागलं आहे. यात विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर, या चारंही हायप्रोफाईल लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विदर्भातील हायप्रोफाईल लोकसभा

लोकसभा निवडणुकीत हायप्रोफाईल मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतात. या मतदारसंघातील हालचाली आणि निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतंही विदर्भातील चार मतदारसंघाकडे देशाचं लक्ष आहे.

नागपूर लोकसभा

केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर लोकसभा मतदारसंघ, शिवाय भाजपची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने, नागपूर भाजपसाठी देशात सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे, गडकरी आणि संघाचं मुख्यालय असल्याने नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात भाजपचं पारडं जड असून काँग्रेसनंही कंबर कसली आहे.

पण या मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आल्याने इथे काट्याची लढत होणार आहे. कारण काँग्रेसने थेट माजी खासदार नाना पटोले यांना मैदानात उतरवलं आहे.

रामटेक लोकसभा

कधीकाळी देशाला पंतप्रधान देणारा रामटेक मतदारसंघ. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनीक यांच्या रामटेक मतदारसंघाकडेही देशाचं लक्ष लागलं आहे. रामटेक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणेंविरुद्ध काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार त्यावर इथली लढत अवलंबून आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल देशातील राजकारणातलं एक मोठं नाव. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला आहे. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नाना पटोलेंनी त्यांच्या गडाला हादरा दिला होता, पण नाना पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशानं प्रफुल्ल पटेल यांचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे. प्रफुल्ल पटेलांमुळे भंडारा-गोंदिया हा देशातील हायप्रोफाईल मतदारसंघ असून, इथे भाजप- राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा

चंद्रपूर हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा मतदारसंघ आहे. हंसराज अहिर भाजपचे उमेदवार असल्यामुळेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडेही देशाचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.

दिग्गज नेत्यांमुळे विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या हायप्रोफाईल मतदारसंघातला पराभव नक्कीच त्या पक्षाला जिव्हारी लागणारा ठरु शकतो. त्यामुळेच या मतदारसंघात विजय मिळावा म्हणून पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...