AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘साहेब, हात खूप दुखतोय…’ थांब जरा म्हणत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम चोळलं!

साहेब हात खूप दुखतोय, असं मनसेच्या मनोज चव्हाण यांनी राज ठाकरेंच्या समोर म्हटल्यानंतर राज ठाकरेंना राहावलं नाही. त्यांनी थेट मनोज चव्हाण यांना मलम लावून आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेतली.

Video | 'साहेब, हात खूप दुखतोय...' थांब जरा म्हणत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम चोळलं!
मलम चोळताना राज ठाकरे
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Dec 23, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांचा कार्यकर्त्याला मलम लावतानाचा एक व्हिडीओ (Video) अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी शेअर केलाय. या व्हिडीओ राज ठाकरे चक्क मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) एका कार्यकर्त्याच्या खांद्याला मलम लावून देत असल्याचं दिसून आलंय. राज ठाकरे यांच्या मुंबईतील (Mumbai) नव्या ‘शिवतीर्थ’ या  (Shivteerth) निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडलाय.

राज ठाकरे मलम चोळताना

नेमकं काय घडलं?

साहेब हात खूप दुखतोय, असं मनसेच्या मनोज चव्हाण (Manoj Chavhan) यांनी राज ठाकरेंच्या समोर म्हटल्यानंतर राज ठाकरेंना राहावलं नाही. त्यांनी थेट मनोज चव्हाण यांना मलम लावून आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेतली. मनोज चव्हाण यांना मलम लावतानाचा व्हिडीओ ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी फेसबुकवर पोस्ट केलाय.

मनोज चव्हाण यांच्या खांद्याला बाम लावून दिला

‘…म्हणून राज ठाकरे दैवत!’

व्हिडीओ शेअर करत फेसबुकवर अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना दैवत म्हटलंय. सोबत त्यांना मी दैवत का म्हणतो, याबाबतचा खुलासा व्हिडीओतील दिल्याचं अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल्य. साहेब आज हात खूप दुखतोय, असं म्हटल्यानंतर मनसेच्या मनोज चव्हाण यांना राज ठाकरेंना थांब जरा असं म्हटलं. त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः मनोज चव्हाण यांच्या खांद्याला मलम लावून दिलंय.

अविनाश जाधव यांनी ही पोस्ट केल्यानंतर असंख्य कार्यकर्यांनी क्षणात या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्यात. मनसे कार्य़कर्त्यांची मनं राज ठाकरेंच्या या कृतीनं पुन्हा एकदा जिंकल्याचं, अविनाश जाधवांच्या फेसबुक पोस्टवर केल्या गेलेल्या कमेंट्समधून अधोरेखित होतंय. अवघ्या १९ मिनिटांत ९९ जणांनी अविनाश जाधवांची ही व्हिडीओ पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत शेअर्सची संख्या दुपटीनं वाढली असेल, हे नक्की!

पाहा अविनाश जाधवांनी शेअर केलेला तो व्हिडीओ –

संबंधित बातम्या –

तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का?, झाली दादांकडून चूक; सुधीर मुनगंटीवारांचे नवाब मलिकांना चिमटे कशासाठी?

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू