AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पबमध्ये नाचणं ते विदेशी गाड्यांचा प्रवास, शिवसेनेकडून पार्थ पवारांची खिल्ली

पुणे : पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना पार्थवर तोफ डागण्यात आली. विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा रेल्वेत बसू लागतो, शेतकऱ्यांच्या शेतात जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधारवण्याचं काम यानिमित्ताने होतंय. पार्थ […]

पबमध्ये नाचणं ते विदेशी गाड्यांचा प्रवास, शिवसेनेकडून पार्थ पवारांची खिल्ली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

पुणे : पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना पार्थवर तोफ डागण्यात आली.

विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा रेल्वेत बसू लागतो, शेतकऱ्यांच्या शेतात जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधारवण्याचं काम यानिमित्ताने होतंय. पार्थ निवडून तर येणार नाही, पण वडील अजित पवारांची चिंता कमी झाली तरी ही निवडणूक सार्थकी लागेल, असं म्हणत शिवतारेंनी खिल्ली उडवली.

शिवाय आजोबा म्हणतो नातवाला निवडून द्या, आणि नातू म्हणतो आजोबांना पंतप्रधान करायचंय. माझी प्रगती म्हणजे तुमची प्रगती. म्हणजे निव्वळ स्वार्थाचं राजकारण, अशा विघातक लोकांना लोकशाहीतून हद्दपार करायला हवं. त्याची संधी या लोकसभेच्या निमित्ताने आल्याचं शिवतारे म्हणाले.

बारामतीचा जनरल डायर आज मुलाला मतं द्या म्हणतोय, मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतही देऊ नका. मावळ गोळीबारातील शहिदांना हीच खरी श्रद्धांजली असेल, असं आवाहन शिवतारेंनी केलं.

पार्थ पवारला निवडणुकीत उतरवलंय म्हणजे भरपूर लक्ष्मी दर्शन होणार, असं सूचक वक्तव्य शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हेंनी केलं. नुकतंच बारामतीत गेले होते, तेव्हा इच्छुकाला उमेदवारी मिळाली नाही तर ते टीव्ही फोडून टाकतात असं एकाने सांगितलं. मग आता आपला विजय घोषित होईल तेव्हा आपले टीव्ही सुरक्षित ठेवावे लागतील, असा टोला निलम गोऱ्हेंनी लगावला. त्या मावळ लोकसभेत बारणेंच्या प्रचारात बोलत असल्याने साहजिकच त्यांचं बोट पार्थकडे होतं.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल