AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही सत्ताधारी वगैरे बघत नाही, नियम मोडल्याने मिटकरींवर कारवाई : विजय वडेट्टीवार

महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण? विरोधक कोण हे पाहत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. Vijay Wadettiwar On AMol Mitkari

आम्ही सत्ताधारी वगैरे बघत नाही, नियम मोडल्याने मिटकरींवर कारवाई : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार आणि अमोल मिटकरी
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 20, 2021 | 1:34 PM
Share

नागपूर :  महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण? विरोधक कोण हे पाहत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. मिटकरी यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते. (Vijay Wadettiwar Statement on Amol Mitkari)

शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचं नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिलेले आहेत. शिवजयंती साजरी करताना कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यातून एकच सिद्ध होतं की महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण? विरोधक कोण हे पाहत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं वडेट्टीवार म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी, आमदार मिटकरींसह 300 जणांवर गुन्हा दाखल

आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले…?

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की यानंतर जर काळजी घेतली नाही तर कठोर पावलं उचलावी लागतील. नागरिकांनी मास्क लावावेत, गर्दी टाळावी. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी तसंच नियमाच्या अधिन राहून सोहळे व्हावेत, यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर करडी नजर ठेऊन नियमांचं न पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे.

साधारणत: संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तसे आदेश दिले आहेत. तेथील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे अधिकार  दिले आहेत.

(Vijay Wadettiwar Statement on Amol Mitkari)

हे ही वाचा :

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...