AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीरेंद्र सेहवाग हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार?

चंदीगड: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग राजकारणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सेहवाग हरियाणामधून आगामी 2019 लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे सेहवागच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील आहे. रोहतकमध्ये भाजप सेहवागला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्रसिंह हुड्डा यांच्याविरोधात सेहवागला उतरवून भाजप नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. लोकसभा […]

वीरेंद्र सेहवाग हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

चंदीगड: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग राजकारणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सेहवाग हरियाणामधून आगामी 2019 लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे सेहवागच्या उमेदवारीसाठी भाजप प्रयत्नशील आहे. रोहतकमध्ये भाजप सेहवागला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्रसिंह हुड्डा यांच्याविरोधात सेहवागला उतरवून भाजप नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.

लोकसभा निवडणूक 2019 बाबत रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्रसिंह हुड्डा यांना मात देण्यासाठी सेहवागच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती, एका भाजप नेत्याने दिली. मात्र हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनी सेहवागच्या उमेदवारीच्या चर्चेबाबत इन्कार केला. सेहवाग तर भाजपमध्ये सहभागीही झालेला नाही, असं बराला म्हणाले.

दुसरीकडे भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला सेहवागपर्यंत ही ऑफर पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे. सेहवागबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे, आता सेहवागने निर्णय घ्यायचा आहे, असं या भाजप नेत्याने सांगितलं.

हंसराज हंसच्या नावाचीही चर्चा वीरेंद्र सेहवागशिवाय सुफी गायक हंसराज हंसच्या नावाचीही भाजपचा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. हंसराज हंस नुकतंच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. सिरसा लोकसभा मतदारसंघात ते भाजपचे उमेदवार असू शकतात. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा गमावली होती.

ही केवळ सोशल मीडियावरील चर्चा’ दरम्यान, आम्ही अद्याप 2019 च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली नाही, असं सुभाष बराला यांनी सांगितलं. हंसराज हंस एक नेते आहेत, मात्र सेहवागने अद्याप पक्षात प्रवेश केलेला नाही. या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियावरच सुरु आहेत, असं ते म्हणाले.

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने हरियाणातील 10 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. हिसार आणि सिरसा या मतदारसंघात आयएनए लढली होती, तर रोहतकमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या 

धक धक गर्ल पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात? 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...