AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी खरंच चहा विकायचे का? मोठ्या भावाचं उत्तर

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच चहा विकत होते का हा प्रश्न काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तर मोदींच्या चहा विकण्यावर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. मात्र पंतप्रधान मोदी खरंच चहा विकत होते की नाही याबाबत मोदींच्या भावानेच उत्तर दिलं आहे. मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी टीव्ही 9 मराठीने खास बातचीत […]

मोदी खरंच चहा विकायचे का? मोठ्या भावाचं उत्तर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच चहा विकत होते का हा प्रश्न काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तर मोदींच्या चहा विकण्यावर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. मात्र पंतप्रधान मोदी खरंच चहा विकत होते की नाही याबाबत मोदींच्या भावानेच उत्तर दिलं आहे. मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी टीव्ही 9 मराठीने खास बातचीत केली.

मोदी चहा विकायचे का?

काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यावर सोमाभाई यांनी काँग्रेसला उत्तर दिलं. ‘रेल्वे स्टेशनवर आमचं वडिलोपार्जित चहाचं कँटिन होतं. त्या कँटिनवर नरेंद्र मोदी रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी चहा विकायचे’, असं सोमाभाई मोदी यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून चहावाला हा मुद्दा प्रचारातील प्रमुख मुद्दा केला होता. त्यानंतर त्यांनी आता आपण देशाचे पंतप्रधान असलो तरी आपण चौकीदार आहोत, देशात अनागोंदी कारभार चालू देणार नाही, असं म्हणत भाजपच्या प्रत्येक मंत्र्याने आपल्या नावापुढे चौकादार लावलं आहे.

नावापुढे चौकीदार का नाही?

‘मी माझ्या नावासमोर चौकीदार लावत नाही, असं सोमाभाई मोदी यांनी सांगितलं. मी तसं माझ्या नावासमोर लावू शकतो, मात्र सध्या लावलेलं नाही, असं सोमाभाई म्हणाले.

सोमभाई मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू आहेत. ते गुजरातमध्ये सामाजिक कार्यात व्यस्त असतात. गुजरातसह महाराष्ट्रात तेली समाजासाठी त्यांनी अनेक कामं केली आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली