Devendra Fadanvis : गृहमंत्री अमित शाह अन् राज ठाकरे यांची भेट होणार की नाही..! देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले संकेत

महापालिका निवडणूकांमध्ये मुंबई हे भाजपाचे लक्ष असणार आहे. त्याअनुशंगाने आता मोर्चेबांधणी सुरु असली तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक ही महत्वाची मानली जात आहे. शिवाय त्यांच्या दौऱ्यात या बैठकीचाही समावेश असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यानंतरचा हा शाह यांचा पहिलाच दौरा आहे.

Devendra Fadanvis : गृहमंत्री अमित शाह अन् राज ठाकरे यांची भेट होणार की नाही..! देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले संकेत
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 8:26 PM

मुंबई : भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह हे दरवर्षी गणेश उत्सवाच्या दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होत असतात. पण यंदा त्यांच्या दौऱ्याची चर्चा आहे ती, (Raj Thackeray) राज ठाकरे यांची भेट घेणार का यावरुन. याला चर्चेला पार्श्वभूमीही तशीच आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका पार पडत आहेत. शिवाय यापूर्वीच (BJP Party) भाजपाच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजप-मनसे यांची युती होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. पण अमित शाह यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होणार नसल्याचेच संकेत दिले आहे. अमित शाह हे लालबागच्या गणपतीचे आणि आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. शिवाय त्यांचे काही नियोजित दौरे आहेत.

असा असणार अमित शाह यांचा दौरा

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासाठी 5 सप्टेंबर रोजी अमित शाह हे मुंबईत दाखल होणार आहेत. ते मुंबईतील काही गणेश मंडळातही दाखल होणार आहेत. लालबागच्या राजाचे ते दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपती बाप्पांचे ते दर्शन घेणार आहेत. तर एका शाळेचेही ते उद्घाटन ते करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी बाबत दरम्यान वक्तव्य केले नाही.

भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

महापालिका निवडणूकांमध्ये मुंबई हे भाजपाचे लक्ष असणार आहे. त्याअनुशंगाने आता मोर्चेबांधणी सुरु असली तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक ही महत्वाची मानली जात आहे. शिवाय त्यांच्या दौऱ्यात या बैठकीचाही समावेश असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यानंतरचा हा शाह यांचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीला वेगळे महत्व आहे.

आगामी निवडणूकांच्या अनुशंगाने दौरा महत्वाचा

केवळ महापालिका निवडणूकाच नव्हे तर लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. शिवाय भाजपाच्या लोकसभा मिशन 400 या अनुशंगाने याच महिन्यात केंद्रीय मंत्री राज्यातील विविध लोकसभा मतदार संघात दाखल होत आहेत. बैठकीत अमित शाह काय कानमंत्र देणार हे देखील महत्वाचे आहे.

राज ठाकरेंच्या भेटीचा उल्लेखही नाही

अमित शाह यांचा दोन दिवासांचा दौरा कसा असेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजप-मनसे युतीबाबत ते बैठक होईल असे सांगितले जात होते. पण या दौऱ्यात तसा काही उल्लेखही नसल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.