AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात एनडीएचेच सरकार येईल : योगेंद्र यादव

नवी दिल्ली : राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (NDA) बहुमत मिळण्याची जास्त शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या यशात सर्वात मोठा वाटा विरोधीपक्षांच्या अपयशाचा असेल, असेही नमूद केले. आपला अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव म्हणाले, “अपेक्षा आणि अंदाज यात फरक करायला हवा. आकडेवारी खोटं बोलत नाही. विरोधीपक्ष अपयशी आणि नालायक […]

देशात एनडीएचेच सरकार येईल : योगेंद्र यादव
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 3:35 PM
Share

नवी दिल्ली : राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (NDA) बहुमत मिळण्याची जास्त शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या यशात सर्वात मोठा वाटा विरोधीपक्षांच्या अपयशाचा असेल, असेही नमूद केले.

आपला अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव म्हणाले, “अपेक्षा आणि अंदाज यात फरक करायला हवा. आकडेवारी खोटं बोलत नाही. विरोधीपक्ष अपयशी आणि नालायक ठरले. विरोधीपक्षांतील एकजुटीच्या अभावानेच एनडीएला बहुमत मिळेल. काही जागा कमी पडल्या तरी एनडीएला इतर पक्षांची मदत मिळेल.”

लोकसभेच्या निकालाचा अंदाज वर्तवताना योगेंद्र यादव यांनी 3 शक्यता वर्तवल्या. त्यापैकी एक म्हणजे एनडीएला बहुमत मिळेल, भाजपला बहुमत मिळेल किंवा तिसरी एनडीएला 4 किंवा 5 कमी पडतील आणि अन्य पक्ष त्यांना मदत करतील.

Tv9-C Voter Exit Poll ने वर्तवलेल्या आकडेवारीनुसार देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज  Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

देशात कुणाला किती जागा?

  • एनडीए – 287
  • यूपीए – 128
  • इतर – 127

यामध्ये भाजप पक्षाला 236 जागा आणि भाजपप्रणित एनडीएला 287 जागा मिळतील. म्हणजेच, भाजपला 2014 च्या तुलनेत देशभरात 46 जागांवर फटका बसणार आहे, असे एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

विशेष म्हणजे, इतर पक्षांमध्ये सपा, बसपा, बीजेडी, टीएमसी, टीडीपी इत्यादी महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.

इतर पक्षांना किती जागा?

  • सपा-बसपा – 40
  • तृणमूल काँग्रेस – 29
  • बिजू जनता दल – 11
  • तेलंगणा राष्ट्र समिती – 14
  • टीडीपी – 14
  • इतर – 19
एग्झिट पोलभाजप + काँग्रेस +इतर
टीव्ही 9-सी व्होटर 287128127
टाईम्स नाऊ –VMR306132104
एबीपी-नेल्सन 267127148
न्यूज 24 – टुडेज चाणक्य34070133
न्यूज नेशन282-290111-126130-138
न्यूज 18- IPSOS 33682124
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 287128127
न्यूज एक्स242164136
रिपब्लिक – जन की बात 30512487

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली