पुण्यात इंजिनीअर तरुणीला जवळ ओढून जबरदस्तीने किस!

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात महिला, मुली सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आहे. कारण एका इंजिनिअरिंगच्या तरुणीला जवळ ओढून किस करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरात जे एम रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक …

2 years man Forcefully Kissed engineering girl in pune, पुण्यात इंजिनीअर तरुणीला जवळ ओढून जबरदस्तीने किस!" width="600" height="395">

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात महिला, मुली सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आहे. कारण एका इंजिनिअरिंगच्या तरुणीला जवळ ओढून किस करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरात जे एम रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित तरुणी लष्कर परिसरातील जे एम रोडवरुन जात होती. एका मित्राला पत्ता विचारण्यासाठी तिने मोबाईलवरुन कॉल केला. मात्र बॅटरी डाऊन झाल्यामुळे तिचा फोन बंद झाला. यामुळे तिने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीची मदत मागत, त्याच्या फोनवरुन मित्राला कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. आरोपीने मोबाईल दिल्यावर, तिने मित्राला कॉल करुन पत्ता विचारला. यानंतर तरुणीने त्याचा मोबाईल परत केल्यावर, धन्यवाद दिले.  मात्र आरोपीने तिचा हात पकडून तिला जवळ ओढून जबरदस्तीने किस केलं.

अचानक असा प्रकार घडल्याने क्षणभर तरुणीला काहीच कळले नाही. तिने याबाबत तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *