AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या कोरोना लशीला ब्रेक, प्रतिकूल परिणामांमुळे पुण्यात चाचणीला स्थगिती

पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने लसीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'अ‍ॅस्ट्राझेनेका'च्या कोरोना लशीला ब्रेक, प्रतिकूल परिणामांमुळे पुण्यात चाचणीला स्थगिती
विशेष म्हणजे या कोरोना रुग्णाला स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून फोन केले जात होते. मात्र, हा व्यक्ती फोन उचलत नव्हता.
| Updated on: Sep 09, 2020 | 9:13 AM
Share

पुणे : जगभराचे डोळे लागलेल्या कोरोना विषाणूवरील लशीच्या पुण्यातील चाचणीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ आणि ‘ऑक्सफर्ड विद्यापीठ’ विकसित करत असलेल्या कोव्हिड 19 लशीची चाचणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुण्यात सुरु असलेल्या चाचणीत सहभागी व्यक्तीवर संशयास्पद प्रतिकूल परिणाम दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (AstraZeneca puts leading COVID19 vaccine trial on hold)

पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोव्हिड 19 लशीची चाचणी आणि उत्पादन केले जात होते. पुण्यातील पाच जणांपासून ही मानवी चाचणी सुरु झाली. त्यापैकी तिघा जणांमध्ये अँटीबॉडी दिसल्याने ते बाद ठरले, तर दोघांना वैद्यकीय त्रास सुरु झाले.

कोव्हिड 19 वर लस तयार करण्याच्या शर्यतीत अग्रणी असलेल्या ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले, की कंपनीच्या आढावा प्रक्रियेत लसीकरण संशोधनाला विराम देऊन सुरक्षेबाबत पुन्हा आढावा घेण्याचे ठरले.

सहभागी व्यक्तीवर दिसलेल्या प्रतिकूल प्रतिक्रियेचे स्वरुप आणि ते केव्हा झाले, हे समजलेले नाही, मात्र त्याची प्रकृती ठीक होण्याची अपेक्षा केली जात आहे.

“जेव्हा एखाद्या चाचणीमध्ये संभाव्य अज्ञात आजार दिसतो, तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र आम्ही या चाचणीची अखंडता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करु” असेही ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

डिसेंबरपर्यंत कोट्यवधी डोसची निर्मिती होईल. भारतामध्ये डिसेंबरमध्ये या लसीची परवाना प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर डिसेंबरमध्ये लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी सांगितलं. (AstraZeneca puts leading COVID19 vaccine trial on hold)

Follow Us
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.