AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुक्त नर्स आणि पतीचे जंगी स्वागत भोवलं, पिंपरीत नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा

कोरोनामुक्त झालेल्या नर्स आणि त्यांच्या पतीचं जंगी स्वागत करताना गर्दी जमावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविकेसह चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत (FIR against NCP corporator for breaking lockdown).

कोरोनामुक्त नर्स आणि पतीचे जंगी स्वागत भोवलं, पिंपरीत नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा
| Updated on: May 01, 2020 | 4:45 PM
Share

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी शारिरीक अंतर राखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुक्त झालेल्या नर्स आणि त्यांच्या पतीचं जंगी स्वागत करताना गर्दी जमावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविकेसह चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत (FIR against NCP corporator for breaking lockdown). मंगला कदम असं या नगरसेविकेचं नाव आहे. त्यांनी ससून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्याचं स्वागत करताना फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

नगरसेविका मंगला कदम यांनी या स्वागतच्यावेळी ढोल-ताशा आणि पुष्पवृष्टी करताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका तयार झाल्याने प्रशासनाने कठोर पावलं उचलली. निगडी पोलिसांनी नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आणि शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसे आदेश देखील दिले गेले आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ‘त्या’ नर्स आणि त्यांच्या पतीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले स्थानिक नगरसेविका आणि माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून ढोल-ताशांच्या गजरात या दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती काही वेळाने या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाली याच प्रकरणाची गंभीर दखल घेत निगडी पोलिसांनी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान, पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवूनही राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यातच राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. राज्यात आतापर्यंत 459 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 92 वर पोहोचली आहे.

कोरोना विषाणूमुळे पुणे जिल्ह्यात गुरुवारी (30 एप्रिल) तब्बल 105 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1700 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पुणे शहराच्या हद्दीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला. 2 मृत्यू हे पुण्याबाहेरील आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 85 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अतिरिक्त मनाई आदेश, कोणकोणत्या भागांचा समावेश?

Pune Corona : पुण्यात 24 तासात 6 कोरोना बळी, मृतांचा आकडा 92 वर

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर

भवानी पेठेत 266, ढोले पाटील रोडवरही दोनशेपार कोरोनाग्रस्त, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

FIR against NCP corporator for breaking lockdown

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.