AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु

भोरच्या (Bhor ST depot converted into flew hospital) डॉक्टर आणि प्रशासनाने एस.टी. डेपोमध्ये मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु केला आहे.

अख्खा एसटी डेपो दवाखान्यात बदलला, भोर डेपोत मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Apr 23, 2020 | 12:43 PM
Share

पुणे: देशात कोरोनाचा विळखा पसरलाय. या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत भोरच्या (Bhor ST depot converted into flew hospital) डॉक्टर आणि प्रशासनाने एस.टी. डेपोमध्ये मोफत फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु केला आहे. या आगळ्यावेगळ्या दवाखान्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भोरचा एसटी डेपो नेहमीच वर्दळीच असतो. मात्र लॉकडाऊनमुळे आता हा परिसर सामसूम आहे. पण या ठिकाणी आता परत लोक येतात ते प्रवासी म्हणून नाही तर रुग्ण म्हणून! त्याचे कारण म्हणजे या एस टी स्थानकात फ्लू बाह्यरुग्ण दवाखाना सुरु करण्यात आला आहे. (Bhor ST depot converted into flew hospital)

भोर तालुक्यातील प्रशासन आणि डॉक्टरांनी चालू केलेले मोफत फ्लू बाह्यरुग्ण हॉस्पिटलमध्ये सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांची मोफत तपासणी केली जात आहे. 28 डॉक्टर याठिकाणी काम करत असून गावपातळीवर डॉक्टर, पोलिस, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन चालू केलेला हा दवाखाना कौतुकास्पद ठरतोय.

पुण्यातील रुग्णसंख्या वाढतीच

पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 934 वर गेली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत एकूण 171 रुग्ण आढळले आहेत. (Corona Hot spot Pune Ward wise Patients)

पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत 53 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत 32 रुग्ण तर आज सकाळी नऊ वाजेपर्यंत 21 रुग्ण वाढले. एकूण मृतांचा आकडा 59 वर गेला आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 2 (0) कोथरुड – बावधन – 1 (0) वारजे – कर्वेनगर –9 (+1) सिंहगड रोड – 9 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 77 (+18) कसबा – विश्रामबाग वाडा –111 (+9) धनकवडी – सहकारनगर – 43 (+5) (Corona Hot spot Pune Ward wise Patients) भवानी पेठ – 171 (+3) बिबवेवाडी – 24 (0) ढोले पाटील रोड – 110 (+13) कोंढवा – येवलेवाडी – 12 (+2) येरवडा – धानोरी – 82 (+14) नगर रोड – वडगाव शेरी – 18 (+2) वानवडी – रामटेकडी – 34 (+2) हडपसर – मुंढवा – 26 (0) पुण्याबाहेरील – 39 (+2)

संबंधित बातम्या 

Pune Corona | पुण्यात एका रात्रीत तब्बल 53 रुग्ण वाढले, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......