'राज'गर्जनेचं स्थळ, वेळ आणि तारीख ठरली

पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची (Raj Thackeray Pune Rally) तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.

'राज'गर्जनेचं स्थळ, वेळ आणि तारीख ठरली

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा (Raj Thackeray Pune Rally) पुण्यात कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची (Raj Thackeray Pune Rally) तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक ठिकाणी परवानगी मागितली, मात्र पोलीस आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी राज ठाकरेंची सभा नातूबागेच्या जवळील मैदानात होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पुण्यात होत आहे.

एकाच दिवशी ठाकरे बंधू पुण्यात

विधानसभेच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुण्यात एकाच दिवशी सभा होत आहे. राज ठाकरे यांची पुण्यात, तर उद्धव ठाकरे यांची पिंपरीत सभा होईल. पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार नाही, पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्यात आली आहे.

“सभेच्या परवानगीशी आमचा संबंध नाही”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मैदान दिलं जात नसल्याचा आरोप केला जातोय. यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. आचारसंहितेत सरकारची कोणतीही भूमिका नसते, असं ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *