युती झाली, मग आता पुणे पालिकेच्या सत्तेत वाटा द्या, सेनेची भाजपकडे मागणी

पुणे : स्वबळाचा नारा देत थकल्यानंतर, शिवसेनेने राम मंदिर, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर भाजपसोबत पुन्हा घरोबा केला. मात्र, युती होण्याआधी मुंबई, पुणे, कडोंमपा यांसारख्या महापालिका सेना-भाजपने स्वबळावर लढल्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांची स्वतंत्र ताकद दिसून आली. मात्र, आता युती झाल्याने आम्हालाही सत्तेत वाटा पाहिजे, अशी अजब मागणी शिवसेनेने पुण्यात केली आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची …

युती झाली, मग आता पुणे पालिकेच्या सत्तेत वाटा द्या, सेनेची भाजपकडे मागणी

पुणे : स्वबळाचा नारा देत थकल्यानंतर, शिवसेनेने राम मंदिर, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्द्यांवर भाजपसोबत पुन्हा घरोबा केला. मात्र, युती होण्याआधी मुंबई, पुणे, कडोंमपा यांसारख्या महापालिका सेना-भाजपने स्वबळावर लढल्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांची स्वतंत्र ताकद दिसून आली. मात्र, आता युती झाल्याने आम्हालाही सत्तेत वाटा पाहिजे, अशी अजब मागणी शिवसेनेने पुण्यात केली आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे.

पुणे महानगरपालिकेत सत्तेत वाटा मिळवण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपकडे पुणे महापालिकेतील उपमहापौरपदाची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेच्या या मागणीला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र जर शिवसेनेला पुणे महापालिकेतील उपमहापौरपद हवं असेल, तर मग मुंबई महानगरपालिकेतील महापौरपद भाजपला अडीच वर्षे मिळावे, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

162 जागांच्या पुणे महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढल्या. या निवडणुकीत भाजपला 98 जागा, तर शिवसेनेला केवळ 10 जिंकता आल्या. रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष भाजपसोबत होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुणे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली. पर्यायाने, शिवसेना विरोधात राहिली.

आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने युती करुन निवडणूक लढली. त्यामुळे आता पुणे महापालिकेतल्या सत्तेतही वाटा पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता भाजपकडून पुण्यात काय अंतिम निर्णय घेतला जातो आणि शिवसेनेकडून मुंबईत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे येत्या काळात पाहावं लागेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *