शिवप्रेमीचा दिलदारपणा, 17 लाख खर्चून हिंजवडीत प्रतापगड उभारला!

पुणे: छत्रपती शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड सर्वांनाच परिचीत आहे. सातारा जिल्ह्यात डौलात उभा असलेला प्रतापगड आता पुण्यातही पाहता येणार आहे. पिंपरी चिंचवडजवळील आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमध्ये, एका शिवप्रेमी तरुणाने किल्ले प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीत तुम्हाला प्रतापगडची अनुभूती घेता येणार आहे. शिवप्रेमी धनंजय बर्वे यांनी हा किल्ला …

शिवप्रेमीचा दिलदारपणा, 17 लाख खर्चून हिंजवडीत प्रतापगड उभारला!

पुणे: छत्रपती शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड सर्वांनाच परिचीत आहे. सातारा जिल्ह्यात डौलात उभा असलेला प्रतापगड आता पुण्यातही पाहता येणार आहे. पिंपरी चिंचवडजवळील आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमध्ये, एका शिवप्रेमी तरुणाने किल्ले प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीत तुम्हाला प्रतापगडची अनुभूती घेता येणार आहे. शिवप्रेमी धनंजय बर्वे यांनी हा किल्ला उभारला आहे.

प्रतापगडी प्रतिकृतीही त्याच्या लौकिकाला साजेशी अशीच आहे. सुमारे अडीच एकरात प्रतापगडची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा किल्ला उभारण्यासाठी 16 ते 17 लाख रुपये खर्च आला आहे.

आयटी नगरी म्हणून देशात हिंजवडीचं नाव प्रसिध्द आहे. आयटी नगरीमध्ये जगाभरातील इंजिनियर कामानिमित्त येतात. त्या सर्वांना छत्रपती शिवरायांचं कौशल्य, त्यांचा पराक्रम, त्यांचा इतिहास माहित व्हावा, या उद्देशाने शिवप्रेमी धनंजय बर्वे यांनी हा भलामोठा प्रतापगड उभारला आहे.

खराखुरा प्रतापगड

छत्रपती शिवरायांचा प्रतापगड हा सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3556 फूट उंचीवर आहे. शिवकालीन रितीप्रमाणे आजही या किल्ल्याचा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो आणि सूर्योदयापूर्वी उघडला जातो.  या किल्ल्यावर अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचा वध केल्याचा इतिहास जगजाहीर आहे.

या किल्ल्याचा विस्तार 1400 फूट लांबी आणि 400 फूट रुंदी एवढा आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे 800 फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. (संदर्भ- विकीपीडिया)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *