पिंपरी चिंचवडमधून अपहरण केलेल्या मुलीची सुखरुप सुटका

पुणे : पिंपरी चिंचवड परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, ते पुन्हा एकदा समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी काल भरदिवसा एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलीचं अपहरण केलं. शाळेतून घरी येत असताना ही मुलगी जेव्हा पेन घेण्यासाठी दुकानासमोर थांबली, तेव्हा तिला जबरदस्तीने गाडीतून पळवण्यात आलं. अपहरणकर्त्याने मुलीचं अपहरण करण्यासाठी शेवरलेट ऑप्ट्रा या गाडीचा वापर केला. …

पिंपरी चिंचवडमधून अपहरण केलेल्या मुलीची सुखरुप सुटका

पुणे : पिंपरी चिंचवड परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, ते पुन्हा एकदा समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी काल भरदिवसा एका व्यक्तीने 12 वर्षीय मुलीचं अपहरण केलं. शाळेतून घरी येत असताना ही मुलगी जेव्हा पेन घेण्यासाठी दुकानासमोर थांबली, तेव्हा तिला जबरदस्तीने गाडीतून पळवण्यात आलं.

अपहरणकर्त्याने मुलीचं अपहरण करण्यासाठी शेवरलेट ऑप्ट्रा या गाडीचा वापर केला. दोघांचा हा सगळा कट होता. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन मुलीची सुखरुप सुटका केली. मुलीची सुटका करुन तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधिन केलं. मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

खंडणीखोरांची कहाणी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या आरोपींनी ओएलएक्सवर 40 हजार रुपयांची गाडी खरेदी केली. त्यानंतर या मुलीचं अपहरण करुन 50 लाख रुपये खंडणी उकळण्याचा आरोपींचा प्लॅन होता. अपहरण तर केलं, पण पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा हा प्लॅन यशस्वी होऊ दिला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *