Astrology: आजचे राशी भविष्य, प्रेम प्रकरणात घाई करणे या राशीच्या लोकांना पडेल महागात

आजचे राशी भविष्य. बारा राशींसाठी असा जाणार आजचा दिवस. या राशीच्या लोकांसाठी उतावीळपणा घातक ठरू शकतो.

Astrology: आजचे राशी भविष्य, प्रेम प्रकरणात घाई करणे या राशीच्या लोकांना पडेल महागात
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 6:13 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

हे सुद्धा वाचा
  1. मेष – या राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे. घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठदुखीची शक्यता आहे. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.
  2. वृषभ –  व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन प्रकल्प घाईगडबडीत सुरू करू नये, आधी त्याच्या सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्यावी.
  3.  मिथुन – कामांचा आळस करणे महागात पडेल. पित्ताचा त्रास संभवतो. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहारात डोळसपणे विश्वास ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नये.
  4.  कर्क – मिथुन राशीच्या लोकांना कार्यालयीन कामानिमित्त्य  इतर शहरात जावे लागू शकते, यासाठी त्यांनी तयारी ठेवावी. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगला नफा कमवू शकतील.  तरुणांनी नवीन नातेसंबंधांमध्ये योग्य अंतर राखले पाहिजे, जास्त वेगाने जवळ येणे चांगले नाही.
  5. सिंह – कार्यालयीन कामाचे कौतुक होईल. व्यापार्‍यांना परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. तत्वाने वागा. क्षणिक नफ्यासाठी तत्वांशी तडजोड करू नका. भावंडांसोबत दिवस आनंदात जाईल.
  6. कन्या – या राशीच्या लोकांवर कार्यालयात कामाचा अतिरेक झाल्यामुळे दबाव वाढेल. आज व्यवसाय सामान्य राहील. पोटाशी संबंधित आजार जसे की बद्धकोष्ठता, गॅसची समस्या जाणवेल. वडिलोपार्जित व्यावसायिक लोकांशी संबंध आणि संपर्क मजबूत करून नफा कमवू शकतील. प्रेमप्रकरणात घाई करणे चुकीचे ठरेल.
  7. तूळ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  8. वृश्चिक- मानसिक ताण हलका होईल. धार्मिक कामात मन रमेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून उत्पन्नाचे मार्ग खुलतील. दिवस आनंदात जाईल.
  9. धनु- आजचा दिवस धावपळीचा राहील. जबाबदारीने कामं करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा. समाधानी वृत्ती ठेवल्याने भविष्यातील हानी टळेल.
  10. मकर- मानसिक ताण जाणवू शकतो. धार्मिक कार्यानिमित्त्य प्रवास संभवतो. मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यक्रमात मान मिळेल. पैशांचा अपव्यय टाळा.
  11.  कुंभ- मोठे निर्णय पुढे ढकलावे. आत्मविश्‍वासात ठेवा आणि स्वतःमध्ये नेतृत्व विकसित करा. जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते. कुटुंबातला कलह थांबविण्यासाठी पुढाकार घ्या.
  12.  मीन- सहलीला जाण्याचा बेत आखाल. इतरांचे मन जपण्यासाठी मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक सुबत्ता लाभेल. व्यसनांपासून दूर राहा. वाताचा त्रास संभवतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.