AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशी भविष्य, या राशींच्या भाग्यात आज धलाभाचा योग

आजचे राशी भविष्य जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार. कोणत्या राशीच्या लोकांना आज धनलाभाच्या योग आहे.

आजचे राशी भविष्य, या राशींच्या भाग्यात आज धलाभाचा योग
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 09, 2022 | 6:55 AM
Share

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  2. वृषभ-  मित्रांकडून सहकार्य मिळेल. भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गरजूंना अन्नदान करा. आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे.
  3. मिथुन-  नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. कोणत्याही वादात पडू नका. व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे.
  4. कर्क- नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  5. सिंह – क्रोधामुळे नुकसान होऊ शकते. आपले वाहन कोणालाही देऊ नका. रात्री उशिरापर्यंत जागू नका. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा.
  6. कन्या- तुमच्यातील चांगल्या वाईट गोष्टी कोणाला सांगू नका. बहिणीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. नातेसंबंधांचा आदर करा. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
  7.  तुळ- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.
  8. वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
  9. धनु- विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. आरोग्याची चिंता दूर होईल. आर्थिक चिंता दूर होईल. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
  10. मकर- ऑफिस कामात व्यस्त असाल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. उधार दिलेले पैले पुन्हा मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  11. कुंभ- आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. गरीब व्यक्तींना मदत करा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करा. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  12. मीन- येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. आपण कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढण्यास सक्षम असाल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?