AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: गुरु पौर्णिमेला जुळून येतोय त्रिग्रही योग; ‘या’ तीन राशींना होणार आर्थिक फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत आले की योग तयार होतो. गुरु पौर्णिमेला (Guru pornima) असाच योग मिथुन राशीत तयार होत आहे. सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह मिथुन राशीत येणार असल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे.   9 ग्रह आणि 27 नक्षत्र आहेत. 9 ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राहु-केतु […]

Astrology: गुरु पौर्णिमेला जुळून येतोय त्रिग्रही योग; 'या' तीन राशींना होणार आर्थिक फायदा
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 05, 2022 | 2:01 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत आले की योग तयार होतो. गुरु पौर्णिमेला (Guru pornima) असाच योग मिथुन राशीत तयार होत आहे. सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह मिथुन राशीत येणार असल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे.   9 ग्रह आणि 27 नक्षत्र आहेत. 9 ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राहु-केतु हे ग्रह सोडले तर इतर ग्रह मेष ते मीन असा प्रवाश करतात. त्यामुळे ग्रहांचा गोचर पाठीपुढे होत असल्याने कधीकधी एकाच राशीत एकापेक्षा अधिक ग्रह येतात. ग्रहांच्या या युतीमुळे योग तयार होतात. त्रिग्रही योगामुळे  तीन राशींना आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.

  1. वृषभ राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला धन आणि वाणीचं स्थान म्हटलं जातं. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
  2. सिंह राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान म्हटलं जातं. या योगामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या मार्गातून पैशांची आवक वाढू शकते.
  3. कन्या राशी: या राशीच्या गोचर कुंडलीतील दहाव्या स्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला कार्यक्षेत्र आणि नोकरीचं स्थान म्हटलं जातं. यामुळे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवी नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान