Astrology: या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळणार परत, कुटुंबात राहील आनंदाचे वातावरण

आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.

Astrology: या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळणार परत, कुटुंबात राहील आनंदाचे वातावरण
नितीश गाडगे

|

Aug 04, 2022 | 5:30 AM

 1. मेष-  दुपारनंतर वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा मुद्दा कोणावरही जबरदस्ती लादू नका.
 2. वृषभ-  तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.  भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे.
 3. मिथुन- खोट्या गोष्टींचा आज अवलंब करू नका. बाहेर जाताना गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा.
 4. कर्क-  तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.  तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे.
 5. सिंह- आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.
 6. कन्या- नोकरीसाठी अर्ज करणं लाभदायक ठरेल. महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करा.
 7. तूळ- तुमच्या नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. गरसमज वाढण्याआधी चर्चा करून मार्ग काढा.
 8. वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींना आज भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. तसंच आजच्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद घालू नका. निर्णय हुशारीने घ्या.
 9. धनु- आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या घरी पाहुणे येतील. अडकलेले पैसे मिळू शकतात.
 10. मकर-  आरोग्याची काळजी घ्या. तसंच घरातील वयोवृद्धांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मित्रांना मदत करा.
 11. कुंभ-  तुमच्या गुरूचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये घाई करून चूक करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील.
 12. मीन- कोणतंही काम काम वेळेवर करण्याची सवय लावा. आजच्या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळतील. गरजू मुलांना मदत करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें