Daily Horoscope 6 July 2022: ‘या’ राशीच्या लोकांना गेलेली संपत्ती पुन्हा मिळणार!

मेष- दिवस चांगला आहे.  चिंता करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. जोडीदाराची मदत मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ टाळा. वृषभ- गरजेपेक्षा अधिक खर्च होईल. गेलेली संपत्ती पुन्हा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तींचा सन्मान करा. धनलाभ होण्याचा योग आहे. कुटुंबात सर्वजण व्यग्र असतील. निर्धनाला दान करा. मिथुन- आळस मागे ठेवा. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. […]

Daily Horoscope 6 July 2022: 'या' राशीच्या लोकांना गेलेली संपत्ती पुन्हा मिळणार!
नितीश गाडगे

|

Jul 06, 2022 | 7:07 AM

 1. मेष- दिवस चांगला आहे.  चिंता करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. जोडीदाराची मदत मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ टाळा.
 2. वृषभ- गरजेपेक्षा अधिक खर्च होईल. गेलेली संपत्ती पुन्हा मिळू शकेल. जवळच्या व्यक्तींचा सन्मान करा. धनलाभ होण्याचा योग आहे. कुटुंबात सर्वजण व्यग्र असतील. निर्धनाला दान करा.
 3. मिथुन- आळस मागे ठेवा. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करा. संध्याकाळी दह्याचं दान करा. मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. धनलाभ होणार आहे.
 4. कर्क- आज तुमच्या राशीला फायदा मिळणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. करिअरमध्ये फायदा होऊन बऱ्याच गोष्टी मनाजोग्या होणार आहेत.
 5. सिंह- दुपारपर्यंत जवळच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या, नोकरीच्या ठिकाणी कोणतेही वाद करु नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
 6. कन्या- ऑफिसमध्ये मन लावून काम तरा. प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. गरजू लोकांना वस्त्र दान करा. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्या. एखाद्या निर्धन व्यक्तीची मदत करा.
 7. तुळ- आजचा दिवस संमिश्र आहे. मानसिक ताणतणावांपासून आता तुमचा दूर होण्यासाठीचा प्रवास सुरु होणार आहे. संपत्तीची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
 8. वृश्चिक- आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज कोणताही वाद घालू नका. दिवस सपभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
 9. धनु- आरोग्याची काळजी घ्या. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. मित्रांची मोलाची मदत तुम्हाला मिळणार आहे.
 10. मकर- वैवाहिक आयुष्यातील सर्व तणाव दूर होणार आहेत. एखादा प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
 11. कुंभ- तुमची वाणी चांगलीच ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.
 12. मीन- मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. शत्रूही मित्र होणार आहेत.  अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत. धनलाभाचा योग आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें