Gems Astro Rules : फायद्याऐवजी होणारं नुकसान टाळायचं असेल तर तुम्ही परिधान केलेल्या रत्नांसंबंधीचे नियम आताच जाणून घ्या

ज्योतीष शास्त्रात बारा राशींच्या स्थानानुसार नवग्रहांचे शुभाशीर्वाद मिळवण्यासाठी नवरत्नांशी संबंधित उपाय सांगितले गेलेत. पण कोणती नवरत्न कुणासाठी शुभ आहेत, हे जाणून घेणंही तितकंच गरजेय.

Gems Astro Rules : फायद्याऐवजी होणारं नुकसान टाळायचं असेल तर तुम्ही परिधान केलेल्या रत्नांसंबंधीचे नियम आताच जाणून घ्या
नेमके काय आहेत नियम?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 2:37 PM

ज्योतीष (Astrology News) शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर नवग्रहांचा प्रभाव पडतो, असं सांगितलं जातं. पत्रिकेतील बारा राशींच्या स्थितीप्रमाणे नवग्रह प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख आणि दुःख यांच्यासोबतच सौभाग्य आणि दुर्भाग्य यासाठीही कारणीभूत ठरतो, असं जाणकार सांगतात. कधी नवग्रहांच्या (Gems Astro Rule) शूभ स्थितीमुळे माणसाला गगनचुंबी यश प्राप्त होतं. तर कधी कल्पनाही केली नसेल असं अपयश नवग्रहातील अशुभ स्थितीमुळे येऊ शकतं. ज्योतीष शास्त्रात नवग्रहांच्या शुभ अशुभ स्थिती बाबत महत्त्वाचे उल्लेख करण्यात आलेले आहेत. काही चमत्कारीक (Interesting Facts) रत्नांशी संबंधिक उपायही सांगण्यात आलेत. ही नवरत्न धारण करण्याआधी त्या संबंधिचे नियमही माहीत असणं गरजेचंय. चला तर जाणून घेऊयात नवरत्नांशी संबंधित नियम..

  1. कोणताही नवरत्न परिधान करण्याआधी तो धातूमध्ये त्यांची बांधणी करावी आणि मगतच तो परिधान करावा असं सांगितलं जातं. अन्यथा मोठं नुकसान होण्याची भीती असते, असं जाणकार सांगतात.
  2. ज्योतीष शास्त्रानुसार रत्ना परिधान करताना विशिष्ट रत्नांसोबत इतर प्रतिकूल रत्नांचं धारण करणंही अयोग्य ठरतं. त्याचा परिमाण जाणवू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जाते. त्यामुळे एका वेळी एकमेकांना प्रतिकूल असणारी रत्न धारण करु नयेत.
  3. ज्योतिष शास्त्रानुसार कोणतंही रत्न उगाचच विनाकारण परिधान करु नये. तसं केल्यास विपरीत परिणाम होण्याची शक्यता जात असते. जाणकार ज्योतिषांच्या मार्गदर्शनानुसारच रत्न परिधान करावेत. त्याच्याशी संबंधित विधी, तिथी, आदींची माहिती घेऊन मगच रत्न धारणं करणं संयुक्तिक ठरेल.
  4. रत्न परिधान करण्याआधी शुभ दिवस, शुभ मुहूर्त, नक्षत्र यांचाही विचार करणं महत्त्वाचं ठरतं. त्यासंबंधिची विधिवत पूजाही कधीकधी करावी लागू शकते, असंही जाणकार सांगतात. त्यामुळे ज्योतीष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे रत्न परिधान करावीत.
  5. रत्न परिधान करण्याआधी ते एखाद्या धातूमध्ये बांधताना, म्हणजेच अंगठी किंवा चैन यामध्ये साकारलं जात असतेवेळी रत्नाचा स्पर्श आपल्या त्वचेला होता राहणंही गरजेचं असतं, असं सांगितलं जातं. शिवाय एकदा नवरत्न साकारलेली अंगठी जर परिधान केली तर ती सारखी काढ-घाल करणंही अयोग्य ठरतं, असं जाणकार सांगतात.

ज्योतीष शास्त्राशी संबंधित इतर बातम्यांसाठी इथे क्लिक करा.

(टीप – सदर माहिती ही धार्मिक आस्था आणि लोक मान्य जाणकारांच्या माहित्या आधारे संपादीत करण्यात आली असून या माहितीचा वैज्ञानिक पुरावा नसून सर्वसामान्य ज्ञान आणि पुस्तकांच्या आधारे वरील मजकूर प्रकाशित कऱण्यात आला आहे. कृपया नवग्रहांबाबत अधिक माहितीसाठी जाणकारांचं मार्गदर्शन जरुर घ्यावं)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.