krishna janmashtami 2022: जन्माष्टमीला करा तुमच्या राशीनुसार नैवैद्य, मनोकामना होतील पूर्ण

| Updated on: Aug 13, 2022 | 4:48 PM

राशीनुसार श्रीकृष्णाला नैवैद्य अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया जन्माष्टमीला श्रीकृष्णाला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

krishna janmashtami 2022: जन्माष्टमीला करा तुमच्या राशीनुसार नैवैद्य, मनोकामना होतील पूर्ण
कृष्ण जन्माष्टमी
Image Credit source: Social Media
Follow us on

krishna janmashtami 2022:जन्माष्टमी हा सण श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी आणि मंदिरांमध्ये गोपाळ कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी भाविक सकाळपासूनच तयारीला लागतात. भक्ती आणि श्रद्धेने सजावट, प्रसाद इत्यादी तयार केले जातात. कन्हैयाला माखन, मिश्रीसह अनेक स्वादिष्ट पदार्थ नैवैद्य म्हणून करण्याची प्रथा आहे.  राशीनुसार श्रीकृष्णाला नैवैद्य अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया जन्माष्टमीला श्रीकृष्णाला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

  1. मेष- ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला गायीच्या दुधापासून बनवलेले गोड पदार्थाचा नैवैद्य दाखविणे शुभ मानले जाते.
  2. वृषभ- वृषभ राशीचे लोकं कृष्णाच्या जयंतीच्या दिवशी  दही साखर किंवा रसगुल्ला याचा नैवैद्य दाखविता येतो.
  3. मिथुन- या राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीच्या दिवशी दह्याचा नैवैद्य दाखवावा. यामुळे त्यांच्या सर्व  मनोकामना पूर्ण होतील.
  4. कर्क-  कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी गोपाळ कृष्णाला दूध आणि केशर अर्पण करावे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- जन्माष्टमीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर सुका मेवा आणि केळी याचा नैवैद्य दाखवावा.
  7.  कन्या- या राशीच्या लोकांसाठी जन्माष्टमीला गायीला गोड भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. तसेच श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी केशर मिश्रित दूध अर्पण करावे.
  8. तूळ- जन्माष्टमीच्या शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळविण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी कलाकंद आणि पाच प्रकारची फळे अर्पण करावीत.
  9.  

    वृश्चिक- वृश्चिक राशीच्या जातकांनी मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी श्रीकृष्णाला केशर भात अर्पण करा.

  10.  

    धनु- जन्माष्टमीच्या दिवशी बदामाची खीर करून लाडू गोपाळांना अर्पण करणे धनु राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते.

  11. मकर- मकर राशीच्या जातकांनी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर  धणे अर्पण करावे.
  12.  

    कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला श्रीकृष्णाला बर्फी अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होईल.

  13.  

    मीन- मीन राशीच्या लोकांनी कृष्णाच्या जन्मदिवशी कान्हाजींना केळी किंवा केशर जिलेबी अर्पण केल्यास ते शुभ होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)