AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: जोतिषशास्त्रात रत्नांना आहे विशेष महत्त्व, रत्न धारण करताना या गोष्टींची घ्यावी काळजी

ज्योतिषशास्त्रानुसार, रत्न धारण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासोबतच काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही रत्ने शुभासोबतच अशुभ फलही देतात.

Astrology: जोतिषशास्त्रात रत्नांना आहे विशेष महत्त्व, रत्न धारण करताना या गोष्टींची घ्यावी काळजी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 11, 2022 | 11:20 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) रत्नांचे खूप महत्त्व सांगितले आहे. कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच ज्योतिष रत्न (James) ठरवते. रत्नांबद्दल बोलायचे झाल्यास, नऊ ग्रहांनुसार सूर्यासाठी माणिक, चंद्रासाठी मोती, मंगळासाठी प्रवाळ, बुधसाठी पन्ना, गुरूसाठी पुष्कराज, शुक्रासाठी हिरा, शनिसाठी नीलम, राहूसाठी गोमेद आणि केतूसाठी लसूण आहे. याशिवाय या रत्नांचे उप-रत्नेही आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, रत्न धारण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासोबतच काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही रत्ने शुभासोबतच अशुभ फलही देतात. जाणून घ्या, ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करताना. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

दुधात जास्त वेळ टाकू नये रत्न

ज्योतिषशास्त्रानुसार अशी अनेक रत्ने आहेत जी दूध शोषून घेतात. त्यामुळे रत्न धारण करण्याच्या काही वेळ आधी दुधात रत्न टाकावे. बरेच लोक रात्रभर दुधात रत्न टाकतात. त्यामुळे रत्नाच्या आत दूध शोषले जाते, यामुले रत्न खराब होतात.

या दिवशी  घालू नये रत्न

जोतिषशास्त्रात  रत्न धारण करण्यासाठी विशिष्ट दिवस सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिन्याच्या 4, 9 आणि 14 तारखेला रत्न कधीही धारण करू नये. याशिवाय अमावस्या, ग्रहण आणि संक्रांतीच्या दिवशी रत्ने धारण करू नयेत.

या दिशेला तोंड करून धारण करावे रत्न

ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करताना बसण्याची दिशाही योग्य असावी. कुठलेही रत्न  दुपारच्या आधी धारण करावे आणि मुख पूर्व दिशेला असावे.

कोणत्या नक्षत्रात रत्न धारण करणे असते शुभ

रेवती, अश्विनी, हस्त, चित्रा, अनुराधा नक्षत्रावर समुद्राशी संबंधित मोती, प्रवाळ धारण करा.

विवाहित महिलांनी या नक्षत्रात रत्न धारण करू नये.

ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित महिलांनी रोहिणी, पुनर्वसु, पुष्य नक्षत्रात रत्न धारण करू नये.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?