AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna Janmashtami 2022: 18 की 19 ऑगस्ट, कधी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी? अनेकांना आहे संभ्रम

श्री कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता.

Krishna Janmashtami 2022: 18 की 19 ऑगस्ट, कधी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी? अनेकांना आहे संभ्रम
कृष्ण जन्माष्टमी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 12, 2022 | 12:45 PM
Share

Krishna Janmashtami 2022: यावेळी 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी होणार आहे. या दिवशी ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहेत. 18 ऑगस्टच्या रात्री  8.42 पर्यंत वृद्धी असेल. यानंतर ध्रुव योग (Druv Yog) सुरू होईल, जो 19 ऑगस्ट रोजी रात्री 8:59 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात हे योग विशेष मानले जातात. या योगात केलेल्या कामाचे फळ शुभ असते.  श्री कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री मथुरेत झाला होता. भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून हा सण दरवर्षी देशभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि मनोभावे देवाची पूजा करतात. या वेळी 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला ध्रुव आणि वृद्धी योगही तयार होत आहे.

जन्माष्टमी 2022 चा शुभ मुहूर्त

यावेळी 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार असल्याचे ज्योतिषी डॉ. विनोद सांगतात. अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.20 वाजता सुरू होईल आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.59 वाजता समाप्त होईल. निशीथ पूजा 18 ऑगस्टच्या रात्री 12:03 ते 12:47 पर्यंत चालेल. निशीथ पूजेचा एकूण कालावधी 44 मिनिटे असेल. पारण 19 ऑगस्ट रोजी पहाटे 5:52 नंतर होणार आहे.

यावर्षी जन्माष्टमीच्या तिथीबाबत बरेच मतभेद आहेत. काही 18 ऑगस्टला तर काही 19 ऑगस्टला जन्माष्टमी असल्याचा दावा करत आहेत. काही जाणकारांचे मत आहे की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला होता, त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी हा योग तयार होत आहे. तर काहींच्या मते 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस अष्टमी तिथी असेल आणि सूर्योदयही याच तारखेला होईल. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पण धार्मिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता झाला. त्यामुळे हा उत्सव 18 ऑगस्टलाच साजरा केला जाणार आहे.

हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्राच्या संयोगात झाला होता. जन्माष्टमीच्या सणाला रोहिणी नक्षत्राचे महत्त्व असते. मात्र यावेळी 18 आणि 19 ऑगस्ट या दोन्ही तारखेला रोहिणी नक्षत्राचा योग होत नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, 19 ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र रात्री उशिरा 01.53 पर्यंत राहील. यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल. त्यामुळे यावेळी जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा योग असणार नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी