AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna janmashtami 2022: कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पूजेचा विधी आणि महत्त्व

श्रावणानंरत भाद्रपद महिना येईल. भाद्रपदात अनेक मोठे सण येतील, त्यापैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krushna janmashtami 2022) हा देखील एक आहे. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात (rohini nakshatra) श्रीकृष्णाचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी भादोच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी […]

Krishna janmashtami 2022: कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पूजेचा विधी आणि महत्त्व
| Updated on: Jul 08, 2022 | 12:32 PM
Share

श्रावणानंरत भाद्रपद महिना येईल. भाद्रपदात अनेक मोठे सण येतील, त्यापैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krushna janmashtami 2022) हा देखील एक आहे. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात (rohini nakshatra) श्रीकृष्णाचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी भादोच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होणार आहे.

जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी 12:05 ते 12:56 पर्यंत अभिजीत मुहूर्त राहील. दुसरीकडे, ध्रुव योग 18 ऑगस्ट रोजी रात्री 08:41 ते 19 ऑगस्ट रोजी रात्री 08:59 पर्यंत असेल. तर 17 ऑगस्ट रोजी रात्री 08:56 ते 18 ऑगस्ट रात्री 08:41 पर्यंत वृद्धी योग आहे.

जन्माष्टमीची पूजा पद्धत

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला शृंगार केल्यानंतर अष्टगंध चंदन, अक्षत आणि रोळीचा तिलक लावावा. माखन मिश्री आणि इतर नैवेद्याचे पदार्थ अर्पण करा. श्रीकृष्णाच्या विशेष मंत्रांचा जप करा. विसर्जनासाठी फुले व तांदूळ हातात घेऊन मूर्तीवर अर्पण करावे आणि म्हणावे – हे भगवान श्रीकृष्ण ! आम्हा सर्वांवर तुझी कृपा राहू दे. पूजेत काळा किंवा पांढरा रंग वापरू नका. कृष्णाला वैजयंतीची फुले अर्पण करणे उत्तम. शेवटी प्रसादाचे वाटप करा.

जन्माष्टमीचा प्रसाद

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यात पंचामृत अर्पण करा. त्यात तुळशीची पाने घाला. पुरणाचा नैवैद्य या पूजेला करू शकता.  काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा नैवैद्यही दाखविला जातो. या दिवशी श्रीकृष्णाला सर्व प्रकारचे पदार्थ असलेले संपूर्ण सात्विक अन्न अर्पण केले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.